शहरं
Join us  
Trending Stories
1
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
2
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
3
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
5
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
6
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
7
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
8
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
9
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
10
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
11
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
12
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
13
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
14
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
15
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
16
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
17
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
18
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
19
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
20
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)

डोळ्याच्या ९२ शस्त्रक्रिया

By admin | Updated: May 8, 2016 01:35 IST

गरजू, गरिबांसाठी वरदान ठरणारी लाइफ लाईन एक्सप्रेस मध्ये उपचार करण्यासाठी ५ मे पासून नेत्ररोगाच्या २६० रूग्णांनी नोंद केली आहे.

२५ मे पर्यंत राहणार: २६० नेत्र रूग्णांची नोंदणी गोंदिया : गरजू, गरिबांसाठी वरदान ठरणारी लाइफ लाईन एक्सप्रेस मध्ये उपचार करण्यासाठी ५ मे पासून नेत्ररोगाच्या २६० रूग्णांनी नोंद केली आहे. त्यांच्यावर (दि.६ व ७) रोजी मोतियाबिंदूच्या ९२ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. एका दिवशी जास्तीत जास्त डोळ्याच्या ६० शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत, असे सांगण्यात आले होते. ६ रोजी ५५ तर ७ रोजी ३७ रूग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. लाइफ लाईन एक्सप्रेस मध्ये उपचार करण्यासाठी विविध आजाराच्या शस्त्रक्रियेसाठी नोंदणी व शस्त्रक्रिया करण्याच्या तारखा ठरविण्यात आल्या आहेत.५ ते ७ मे दरम्यान डोळ्यांचे परीक्षण, ६ ते १२ मे दरम्यान डोळ्यांचे मोतियाबिंदू शस्त्रक्रिया, १३ व १४ मे रोजी फाटलेल्या ओठांचे परीक्षण व उपचार तर १४ ते १६ मे दरम्यान त्यांची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. १७ ते १९ मे दरम्यान कानाचे विकार परीक्षण तर १८ ते २४ मे दरम्यान शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. १३ व १४ मे रोजी पोलीओ परीक्षण तर १४ ते १६ दरम्यान पोलीओ शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. १७ ते २३ मे दरम्यान दातांचे परीक्षण व उपचार तर १३ ते १६ मे दरम्यान महिलांचे स्तन, गर्भाशय, ग्रीवा कर्करोग परीक्षण व त्यावर उपचार केला जाणार आहे. डोळ्यांची शस्त्रक्रिया मध्यप्रदेशच्या छिंदवाडा येथील डॉ.धर्मेंद्र सिंग, केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयातील डॉ.चंद्रशेखर पारधी, डॉ. अनिता पोयाम, डॉ. स्रेहल कोकोडे हे करणार आहेत. ४२० रूग्णांच्या मोतिबिंदूची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. परंतु दोन दिवसात पाहिजे त्या प्रमाणात नोंदणी झाली झाली नाही. (तालुका प्रतिनिधी)