शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अवांतर वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या बौध्दिक पातळीत भर- चौधरी

By admin | Updated: September 15, 2016 00:35 IST

जिल्हा परिषदेच्या वतीने विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वागिण विकास साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आमगाव : जिल्हा परिषदेच्या वतीने विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वागिण विकास साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाव्यतिरीक्त अवांतर पुस्तके वाचण्याचा छंद निर्माण व्हावा म्हणून वाचन-आनंद दिवस साजरा करण्यात आला. या अवांतर वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या बौध्दिक पातळीत भर पडल्याचे जाणवले, असे उद्गार देवरी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्पाधिकारी जितेंद्र चौधरी यांनी व्यक्त केले.पं.स.आमगावअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक डिजीटल शाळा बिरसी येथे दिलेल्या भेटीदरम्यान ते बोलत होते. बिरसी येथील शाळेत वर्ग पहिली व दुसरीचे विद्यार्थी चित्ररुपी पुस्तके प्रोजेक्टरच्या माध्यमातून शिक्षण घेत असल्याचे पाहून फार आनंद झाला. त्यांनी या चिमुकल्या बालकांसोबत बसून हितगुज केले. पाढे, कविता व चित्ररुपी पुस्तकांचे वाचन घेतले. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहून त्यांचे चौधरी यांनी तोंडभरून कौतुक केले. वर्ग तिसरी ते पाचवीच्या मुलांना कथा, गोष्टी, इसापनिती वाचण्यास सांगितले. त्यालाही विद्यार्थ्यांने चांगला प्रतिसाद दिला. बिरसी शाळेच्या उपक्रमांची व स्नेहसंमेलनाची क्लीप प्रोजेक्टरवर बघून शाळेत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची अधिकाऱ्यांनी प्रशंसा केली. मुख्याध्यापक एल.यू.खोब्रागडे यांच्यासह सर्व शिक्षकांचे व ग्रामवासीयांचे त्यांनी कौतुक केले. या अनुषंगाने शालेय पोषण आहार, आंगणवाडी व शालेय परिसराची पाहणी केली. परिसर अतिशय सुंदर असल्याचा शेरा नमूद केला. जि.प.शाळेत शिकूनच मी या पदावर कशाप्रकारे पोहोचलो हे सांगून आपणसुध्दा निरंतर अभ्यास केला तर माझ्यापेक्षाही मोठ्या पदावर पोहचू शकता, अशी प्रेरणा दिली. या भेटीदरम्यान केंद्र प्रमुख डी.एल.गुप्ता, विषयतज्ज्ञ वशिष्ट खोब्रागडे, शा.व्य.स.अध्यक्ष राजकुमारी चौधरी, सदस्ता ममता पटले, वच्छला उईके, एल.यू.खोब्रागडे, उपक्रमशिल शिक्षीका वर्षा बावनथडे, तंत्रस्नेही शिक्षक विकास लंजे व पालक वर्ग उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)