शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

परवाना नसलेल्या जागेत गौण खनिजाचे उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 23:39 IST

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून शेतांमध्ये पिके आहेत. त्यामुळे या कालावधी गौण खनिजाचे उत्खनन करण्याची परवानगी दिली जात नाही. मात्र एका कंत्राटदाराने महसूल विभागाच्या डोळ्यात धुळफेक करीत परवानगी नसलेल्या जागेतून अवैध उत्खनन केल्याचा धक्कादायक प्रकार हलबीटोला येथे उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देमहसूल विभागाचे डोळ्यावर हात : लाखो रुपयांचा महसूल पाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून शेतांमध्ये पिके आहेत. त्यामुळे या कालावधी गौण खनिजाचे उत्खनन करण्याची परवानगी दिली जात नाही. मात्र एका कंत्राटदाराने महसूल विभागाच्या डोळ्यात धुळफेक करीत परवानगी नसलेल्या जागेतून अवैध उत्खनन केल्याचा धक्कादायक प्रकार हलबीटोला येथे उघडकीस आला आहे.प्राप्त माहितीनुसार गोरेगाव येथील तहसीलदारांनी गोरेगाव मंडळातील साझा क्र मांक ०८ मध्ये येणाऱ्या हलबीटोला येथील शेतकरी सुकचंद पटले यांच्या गट क्र मांक ९/३ आराजी ०.७१ हेक्टर आर पैकी ०.२० हेक्टर आर जागेतून पटले यांना २५ ब्रास मुरु म उत्खननांची परवानगी दिली. मात्र या शेत जमिनीत भात पिक लावले असल्याने परवानाधारकाने अगडे यांच्या शेतजमिनीतून २४ सप्टेबरपासून जेसीबी लावून अवैध उत्खनन सुरु केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.हलबीटोला येथील शेतकरी सुकचंद पटले यांनी १५ सप्टेबरला ५० ब्रास मुरु म उत्खनन व वाहतूक करण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज सादर केला होता. त्या अर्जानुसार सांझा क्र मांक ०८ मध्ये येणाºया शेतजमीन गट क्र मांक ९/३ आराजी ०.७१ हे आर पैकी ०.२० हेक्टर आर शेत जमिनीतून २५ ब्रास मुरूम उत्खनन करण्याची परवानगी २४ ते ३० सप्टेबरपर्यंत दिली. मात्र या गट क्रमाकांत तहसीलदाराने परवानाधारकास मुरूम उत्खननाची परवानगी कशी दिली अशी गावकºयांमध्ये चर्चा आहे. सध्या सुकचंद पटले यांच्या शेतजमिनीत धानपिक असल्याने या ठिकाणी मुरु म उत्खननाची कामे सुरु केले नाही.मात्र गोरेगाव नगरपंचायतीच्या घनकचरा केंद्राच्या जवळ ७०० फूट अंतरावर असलेल्या अगडे यांच्या शेतजमिनीतून जेसीबीने २४ सप्टेबरपासून अवैध मुरु म उत्खनन सुरु आहे. गौणखनिज उत्खनन करण्याची परवाणगी तहसीलदार यांनी दिल्यानंतर तलाठ्याने गौणखनिज उत्खनन जागेचे मोजमाप परवानाधारकास करु न द्यावे लागते.मात्र तलाठ्याने याकडे दुर्लक्ष केल्याने परवानाधारकाने विना परवाना शेतजमिनीतून अवैध मुरु म उत्खनन सुरु केले आहे. हे उत्खनन जेसीबीने करता येत नाही. परंतु सर्रास जेसीबीने लावून उत्खनन केले जात आहे. जेसीबीने १० फूट खोल खड्डा केल्याने तीन दिवसात २०० ब्रास मुरु म वाहतूक करु न हिराडामाली एमआयडीसी जवळील घनकचरा केंद्राजवळ जमा केल्याची माहिती आहे.याबाबत तलाठी गौरीशंकर गाढवे यांच्याशी संर्पक साधला असता नियमानुसार उत्खनन झाले नसल्यास पंचनामा करुन दंडात्मक कारवाही केली जाईल असे लोकमतशी बोलताना सांगितले. तर तहसीलदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला. त्यामुळे या सर्व प्रकराची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.