शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हटिया-पुणे ट्रेनच्या परिचालनात विस्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 01:06 IST

रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी चालणाऱ्या द्वि साप्ताहिक स्पेशल ट्रेनच्या परिचलनात विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाईन लोकमतगोंदिया : रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी चालणाऱ्या द्वि साप्ताहिक स्पेशल ट्रेनच्या परिचलनात विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वेगाड्यांमध्ये होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी व प्रवाशांची सुविधा लक्षात घेवून रेल्वे प्रशासनाने हटिया व पुणे दरम्यान २ मार्च २०१८ पर्यंत चालणाºया साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल ट्रेनच्या परिचालनात २९ जून २०१८ पर्यंत विस्तार केला आहे. ही गाडी प्रत्येक बुधवारी हटियावरून पुणेसाठी ७ मार्च ते २७ जूनपर्यंत (०२८४६) या क्रमांकाने तसेच प्रत्येक शुक्रवारी पुणेवरून हटियासाठी ९ मार्च ते २९ जूनपर्यंत (०२८४५) या क्रमांकाने धावेल. सदर स्पेशल ट्रेनमध्ये दोन एलएसआर, चार सामान्य श्रेणी, सहा स्लीपर कोच, एक एसी-२, चार एसी-३ यासह एकूण १७ कोच राहतील.हटिया-पुणे (०२८४६) हटिया-पुणे साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल हटियावरून मार्च, एप्रिल, मे व जून महिन्याच्या प्रत्येक बुधवारी रात्री ९ वाजता सुटेल. तसेच गोंदिया स्थानकावर गुरूवारी सकाळी ९.१० वाजता पोहचेल. तर पुणे-हटिया (०२८४५) साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल पुणेवरून मार्च, एप्रिल, मे व जून महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी सकाळी १०.४५ वाजता सुटेल. तसेच गोंदिया स्थानकावर शनिवारी पहाटे ४.०६ वाजता पोहचेल.सांतरागाछी-हापा समर स्पेशलउन्हाळ्यात प्रवाशांची गर्दी व सुविधा लक्षात घेवून रेल्वे प्रशासनाने सांतरागाछी व हापा दरम्यान एक साप्ताहिक एसी समर स्पेशल ट्रेन १३ फेरींसाठी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ६ एप्रिल ते २९ जूनपर्यंत सांतरागाछीवरून हापासाठी प्रत्येक शुक्रवारी (०२८३४) या क्रमांकाने व याचप्रकारे विपरित दिशेत प्रत्येक सोमवारी हापा ते सांतरागाछीसाठी ९ एप्रिल ते २ जुलैपर्यंत (०२८३३) क्रमांकाने धावेल. या ट्रेनमध्ये रेल्वे नियमांनुसार स्पेशल चार्ज लागेल. यात एसी-३ च्या १४ कोच व दोन पॉवरकारसह एकूण १६ कोच राहतील. सांतरागाछी-हापा (०२८३४) ही गाडी गोंदियाला शनिवारी दुपारी १२.५३ वाजता पोहोचेल. तर हापा-सांतरागाछी (०२८३३) ही गाडी गोंदियाला मंगळवारी दुपारी १२.४१ वाजता पोहचेल.