शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तलावांचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: August 13, 2015 02:25 IST

तलावाचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शहरात व गावखेड्यात तलाव,

अतिक्रमणाचा फटका : तलावांचे खोलीकरण आवश्यक साकोली : तलावाचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शहरात व गावखेड्यात तलाव, बोड्यांची संख्या मोठी आहे. मात्र कालांतराने स्थानिक रहिवासी तसेच जमीन माफियांनी या तलाव व बोड्यांवर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे तलाव व बोड्या नामशेष होत आहेत.भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यातील गावात लहान-मोठे तलावाची संख्या किमान एक दोन आहेत. पाणी साठ्यामुळे भूगर्भातील जलसाठा असल्याने काही वर्षांपूर्वी ग्रामीण नागरिकांना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत नव्हता तर शेतशिवारातील तलाव व बोड्यामधील पाण्याचा उपयोग सिंचनासाठी होत होता. मात्र आता या बोड्या व तलावावर जमीन माफियांची नजर व नागरिकांचे अतिक्रमण वाढत चालले आहे. त्यामुळे तलाव व बोड्या नामशेष होत आहेत.भंडारा जिल्ह्याचे प्रमुख पीक असलेल्या धानपिकासाठी सिंचन व्यवस्था म्हणून मोठे प्रकल्प असले तरी त्याचा पाहिजे त्या प्रमाणात शेतीला उपयोग होत नाही. परिणामी शेतशिवारातील तलाव, बोड्या मोठ्या प्रमाणात सिंचन केले जाते. मागील दहा वर्षापासून अनियमित पावसामुळे तलाव व बोड्यातील पाणीसाठ्यामध्ये घट झाल्याने शेतकऱ्यांचे सिंचनाचे हे स्त्रोतही कुचकामी ठरू लागले आहे. पावसाळ्याव्यतिरिक्त हे तलाव व बोड्या कोरड्या राहतात. हीच स्थिती गावशिवारातील तलाव व बोड्यांची असल्याने भूगर्भातील जलसाठा आटत चालला आहे. दरवर्षी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर तोडगा म्हणून 'पाणी अडवा पाणी जिरवा' कार्यक्रमांतर्गत अनेक योजना ग्रामीण भागात राबविल्या जात आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन व त्यानुसार अंमलबजावणी योग्यरीत्या होत नसल्याने गाव व शेतशिवारात वर्षानुवर्षे असलेल्या तलाव व बोड्यांना या कार्यक्रमातूनही नवसंजीवनी मिळत नसल्याचे लक्षात येते. सिंचन व पाणीटंचाईच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या तलाव व बोड्याकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने त्याचा फायदा काही जमीन माफिया व स्थानिक ग्रामीनांना उचलायला पाहिजे. प्रत्येक गावात दोन तीन तलाव वा बोड्यापैकी एकतरी नामशेष झाल्याचे दिसते. परिणामी तलावाचा जिल्हा म्हणून असलेल्या जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना पाणीटंचाई तर शेतीला सिंचनाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. ही स्थिती जिल्हास्तरावर प्रामुख्याने पाहायला मिळते. वाढती लोकसंख्या हे त्यामागचे एक कारण असले तरी जमिनीचे व्यवसायीक या शहरातील तलावाचे अस्तीत्व नष्ट होत चालले आहे. मात्र तालुका व नगर प्रशासनाकडून त्याकडे डोळेझाक होत असल्याचे जमीन माफियांचे चांगलेच फावत आहे. तलावाच्या जिल्ह्यासोबत नक्षल प्रभावित, आदिवासी व मागास जिल्हा म्हणून जिल्ह्याची ओळख होत असली तरी जिल्ह्याचे राजकीय अस्तीत्व राज्य व केंद्र स्तरावर पोहचले आहे. त्यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात मोठे धरण व जलाशयाची निर्मिती झाली असली तरी नागरी वस्तीतील तलाव व बोड्यांतील अस्तित्वाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सामाजिक संघटनांनी परिसरातील गाव तलाव व बोड्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.