शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गांडूळ खत निर्मितीतून ओल्या कचऱ्याचे निर्मुलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 21:27 IST

शहरात निघणाऱ्या ओल्या कचऱ्याचे निर्मुलन करता यावे यासाठी नगर परिषदेने या कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मितीचा प्रयोग केला आहे. यासाठी नगर परिषदेने शहरात पाच जागांवर टँक बनविले असून तेथे ओल्या कचऱ्यावर प्रक्रीया करून गांडूळ खत निर्मिती केली जात आहे.

ठळक मुद्देनगर परिषदेचा यशस्वी प्रयोग : प्रयोगशाळेने दिला पॉजिटिव्ह रिपोर्ट

कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरात निघणाऱ्या ओल्या कचऱ्याचे निर्मुलन करता यावे यासाठी नगर परिषदेने या कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मितीचा प्रयोग केला आहे. यासाठी नगर परिषदेने शहरात पाच जागांवर टँक बनविले असून तेथे ओल्या कचऱ्यावर प्रक्रीया करून गांडूळ खत निर्मिती केली जात आहे. विशेष म्हणजे, नगर परिषदेने अशाप्रकारे तयार केलेल्या गांडूळ खताच्या नमुन्यांना प्रयोगशाळेने पॉजिटिव्ह रिपोर्ट दिला आहे.शासन सध्या स्वच्छतेवर जास्त भर देत असून स्वच्छ भारत अभियान आता एक चळवळ म्हणून राबविले जात आहे. शहर स्वच्छ असल्यास वातावरण शुद्ध राहून नागरिकांचे आरोग्यही चांगले राहणार हे सत्य आहे.यामुळे शासनाकडून स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता सर्वेक्षणाच्या माध्यमातून शहरांची रँकींगही केली जात आहे. एकंदर शहर स्वच्छ रहावे यासाठी शहरातील कचºयाच्या निर्मुलनावर भर दिला जात आहे.यात मोठ्या शहरांकडे तेवढ्या प्रमाणात यंत्रणा व सोयी असल्याने त्यांच्याकडून कचरा निर्मुलन सहज केले जाते. मात्र येथील नगर परिषदेकडे त्याप्रमाणात यंत्रणा व सोयी नाहीत.परिणामी शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावणे जिकरीचे काम झाले आहे. यातूनच शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारही दिसून येतात. यात सर्वात जास्त धोका ओल्या कचऱ्यापासून असतो. ओल्या कचऱ्यापासून एकतर दुर्गंध पसरते शिवाय त्यातून डास व किड्यांची उत्पत्ती होऊन आजारांचा धोका बळावतो.यावर तोडगा म्हणून नगर परिषदेने ओल्या कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मिताचा प्रयोग हाती घेतला. डिसेंबर २०१७ पासून नगर परिषदेने या प्रयोगांतर्गत शहरात पाच ठिकाणी टँक तयार केले असून त्यात ओल्या कचऱ्यावर प्रक्रीया केली जात आहे.अशाप्रकारे तयार करण्यात आलेल्या गांडूळ खताचे नमुने नगर परिषदेने अमरावती येथे प्रयोगशाळेत पाठविले होते. प्रयोगशाळेने त्या नमुन्यांना पॉजिटिव्ह रिपोर्ट दिला आहे हे विशेष.बागेत केला जातो गांडूळ खताचा वापरनगर परिषदेने ओल्या कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मितीसाठी नगर परिषद कार्यालयाच्या मागील भागात, अग्निशमन विभाग, इंजिनशेड शाळा, मालवीय शाळा व सुभाष बागेत टँक बनविले आहेत. येथे ओल्या कचऱ्यावर प्रक्रीया करून गांडूळ खत निर्मिती केली जात आहे. भविष्यात हा प्रयोग मोठ्या प्रमाणावर केला जाणार असून त्यातून नगर परिषदेला आर्थिक उत्पन्नही होणार आहे. सध्या नगर परिषदेने तयार केलेल्या खताचा वापर सुभाष बागेत केला जात आहे.