शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

जागतिक पर्यावरण दिवस उत्साहात

By admin | Updated: June 9, 2017 01:28 IST

मध्य भारत एज्युकेशन सोसायटी, सस्टेनिग एनव्हायर्नमेंट व वाईल्डलाईफ असेम्बन्स व जन शिक्षण संस्थान यांच्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मध्य भारत एज्युकेशन सोसायटी, सस्टेनिग एनव्हायर्नमेंट व वाईल्डलाईफ असेम्बन्स व जन शिक्षण संस्थान यांच्या संयुक्तवतीने सोमवारी (दि.५) छोटा पाल चौक येथे जागतिक पर्यावरण दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन लोक कल्याण शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. सुरजकुमार पाल यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी अध्यक्ष, सस्टेनिग एनव्हायर्नमेंट व वाईल्ड लाईफ असेम्बलन्स संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका नेहा नायक, मैथुला बिसेन, दिपक बोबळे, चीत्रा जितेश वडेरा, जीवनज्योती रघुवंशी, महेंद्र लिल्हारे, मध्य भारत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सम्राट पाल उपस्थित होते. याप्रसंगी सम्राट पाल यांनी प्रास्ताविकात, पर्यावरण अनुकुल असल्यास मनुष्य आपल्या शारीरिक व मानसिक क्षमतेचा भरपूर उपयोग करत आहे व आपल्या आरोग्याला पण कायम ठेवले आहे. वन्य प्राणी-पक्ष्यांचे संरक्षण करणे वनाचे रक्षण, झाडे तोडण्यास आळा, आठवड्यातून एक दिवस सायकल चालविणे नदी व तलावात कचरा न टाकणे, पाण्याची बचत, रेन वॉटर, हार्व्हेंस्टींग तंत्र उपयोगात आणणे व पर्यावरण संरक्षणासाठी नेहमी सजग राहून दुसऱ्यांनाही प्रेरणा देणे इत्यादी महत्वपूर्ण माहिती दिली. बोबळे यांनी, वनांपासून जनसंधारण व मृद संधारण होऊन पावसाचे पाणी जमिनीत झिरपते. ज्यामुळे भुजलाचे स्तर वाढते. तापमान नियंत्रण, पुर नियंत्रण, रोग नियंत्रण, पाऊस, ग्लोबल वार्मिग, जलवायुचे प्रदर्शन नियंत्रीत होते असे मत व्यक्त केले. नायक यांनी, वृक्ष कार्बनडाय आॅक्साईड शोषूण घेतात आणि आॅक्सीजन देतात. दैनिक व्यवहारात उपयोगात आणली गेलेली प्लास्टीक थैली न फेकता त्याला जाळली पाहिजे. यापासून काही प्रमाणात प्रदूषणावर अंकुश लावता येऊ शकते असे मत व्यक्त केले. डॉ.पाल यांनी, जागतिक पर्यावरण दिन मोहीम संयुक्त राष्ट्रसंघाच्या जनरल विधानसभा करून १९७२ मध्ये गेला. ते जून महिन्यात प्रत्येक वर्षी महिन्याच्या ५ व्या दिवशी साजरा केला जातो. तो मानव पर्यावरणावर स्टोकहोम परीषद नजीकच्या भविष्यात उघडण्याच्या पर्यावरण समस्या लक्ष काढणे वार्षिक मोहीम म्हणून घोषीत करण्यात आले. जगातील तीव्र हवामान समस्या जागृती निर्माण करण्यासाठी मुख्य साधन म्हणून युनायटेड नेशन्सद्वारे उत्पादीत होते असे सांगीतले. बहेकार यांनी घरातून निघालेल्या केरकचऱ्याची विल्हेवाट लावली पाहिजे नाहीतर त्यांचे दुष्परिणाम प्राणीमात्रावर होतात. तसेच जवळपासचे वातावरण हिरवेगार असावयास हवे. याकरीता शासकीय, अर्धशासकीय आणि निजी संस्थाना वृक्ष लावण्याकरीता प्रेरीत करायला पाहिजे. जोपर्यंत लोकांचा सहभाग राहणार नाही तो पर्यत वृक्ष लावणे आणि त्यांचे संवर्धन अभियान सफल होणार नाही. पर्यावरणासाठी झाडांची आवश्यकता असते. निसर्गात असलेल्या प्रत्येक झाडाचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी होऊ शकतो. सुधारण्याची सुरुवात आपल्या घरापासून करावी. प्रत्येक घरी झाडांची लागवड केली तर काही अंशी का होईना पर्यावरणात सुधारण होऊन घर परिसर स्वच्छ व सुंदर दिसतो असे मत व्यक्त केले. या दिवसाचे औचित्य साधून जन शिक्षण संस्थाद्वारे तयार करण्यात आलेल्या पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच ओला व कोरडा कचरा कुंडीचे प्रकाशन करून वृक्षारोपण करण्यात आले. संचालन विनायक डोंगरवार यांनी केले. आभार महेश बिसेन यांनी मानले. कार्यक्रमासाठी अजय खवसकर, नंदीनी गणवीर, मंगेश शेंडे, दिपक उईके, विनायक डोंगरे आदिंनी सहकार्य दिले.