शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
4
लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
5
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
6
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्याधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
7
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
8
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
9
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
10
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
11
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
12
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
13
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
14
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
15
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
16
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
17
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
18
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
19
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
20
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार

निकालाची उत्सुकता शिगेला

By admin | Updated: May 15, 2014 23:41 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार याचा फैसला शुक्रवारी (दि.१६) होणार आहे. सकाळी ८ वाजतापासून भंडारा

भंडार्‍यात आज मतमोजणी : ८४ टेबलवर चालणार मोजणी,

गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार याचा फैसला शुक्रवारी (दि.१६) होणार आहे. सकाळी ८ वाजतापासून भंडारा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात मजमोजणीला सुरूवात होणार असून अंतिम निकाल सायंकाळी ४ पर्यंत येण्याची शक्यता आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत २६ उमेदवार आपले भाग्य आजमावत असले तरी ना.प्रफुल्ल पटेल आणि आ.नाना पटोले यांच्यात ही लढत रंगल्यामुळे या दोघांपैकी कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून त्यासाठी ३00 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी पत्रकारांना दिली. दि. १0 एप्रिल रोजी पार पडली. त्यानंतर सर्व मतदान यंत्र भंडार्‍याच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातील स्ट्राँगरुममध्ये पोलिसांच्या चोख बंदोबस्त ठेवण्यात आले. तब्बल एक महिना पाच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर दि. १६ मे रोजी मतमोजणी होत आहे. सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. सर्वप्रथम टपाली पतपत्रिकेची मतमोजणी होईल. त्यानंतर विधानसभा क्षेत्रनिहाय एकाचवेळी मतमोजणी सुरू होणार आहे.

मतमोजणी केंद्रात दोन्ही जिल्ह्यातील सर्व सहाही विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रत्येकी १४ टेबलची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रत्येक टेबलवर मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक व सुक्ष्म निरिक्षक अशा तीन अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे एकूण मतदान केंद्राप्रमाणे आवश्यक फेर्‍या निश्‍चित करण्यात आल्या आहेत. तुमसर विधानसभा क्षेत्रासाठी २६ मतमोजणी फेर्‍या होतील. भंडारा क्षेत्रासाठी ३१, साकोली क्षेत्रासाठी २७, अर्जुनी (मोरगाव) क्षेत्रासाठी २२, तिरोडा क्षेत्रासाठी २१ तर गोंदिया विधानसभा क्षेत्रासाठी २४ फेर्‍यांची संख्या निश्‍चित करण्यात आली आहे. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर प्रत्येक उमेदवाराला मिळालेली मते जाहीर करण्यात येतील. सात तासात मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईल, असे नियोजन निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे. मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व ईव्हीएम पुन्हा सील करण्यात येतील.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील सैनिक मतदारांना ३,५२६ मतपत्रिका पाठविण्यात आलेल्या असून निवडणूक कर्तव्यात नेमणूक झालेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांना १,४९५ मतपत्रिका पाठविण्यात आले आहे. यानुसार ५,0२१ टपाली मतपत्रिका पाठविण्यात आलेले असून दि. १३ मे पर्यंत मतदान होऊन ९५९ टपाली मतपत्रिका प्राप्त झालेले आहेत.

पत्ता बरोबर नसल्यामुळे, राहत नसल्यामुळे, पत्ता बदलल्यामुळे व अन्य कारणास्तव मतदान न होता एकूण २,५५९ टपाली मतपत्रिका परत आलेल्या आहेत. टपाली मतपत्रिकांच्या मोजणीसाठी दोन टेबलची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे.

मतमोजणी भंडार्‍यात असल्यामुळे सकाळीच भंडार्‍याला जाण्यासाठी भाजपने सर्वाधिक गाड्या बुक केल्या आहेत. मतमोजणीसाठी नागरिकांची मतमोजणी केंद्राजवळ हजारोंची गर्दी होणार असल्यामुळे सामाजिक न्याय भवनाच्या आत व बाहेरील परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे.

भंडार्‍यातील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक तसेच या मार्गाला मिळणारे अन्य अंतर्गत मार्ग रहदारीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावरील जड वाहतूक बायपास मार्गावरून वळविण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांसह पॅरामिलिटरी फोर्स, राज्य राखीव पोलीस दल व पोलीस जवान ठिकठिकाणी तैनात करण्यात येणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)