शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
3
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
4
चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
5
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
6
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
7
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
8
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
9
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
10
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
11
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
12
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
13
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
14
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
15
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
16
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
17
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
18
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
19
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

मनुष्यबळाअभावी एक्साईज विभाग हतबल

By admin | Updated: July 5, 2015 02:03 IST

राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगत असणाऱ्या बारवरील कारवाईत होत असलेल्या दिरंगाईसाठी राज्य उत्पादन शुल्क ...

गोंदिया : राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगत असणाऱ्या बारवरील कारवाईत होत असलेल्या दिरंगाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागातील अपुरे मनुष्यबळ कारणीभूत असल्याचे कारण या विभागाच्या वतीने दिले जात आहे. असे असले तरी या गंभीर बाबीसाठी कारवाई करण्यास २ वर्षातही वेळ मिळू नये, ही बाब खटकणारी ठरत आहे.‘बिअर बार’चा परवाना रद्द करण्याचा आदेश एक्साईज विभागाच्या (राज्य उत्पादक शुल्क) आयुक्तांनी दोन वर्षांपूर्वी काढला होता. मात्र गोंदिया जिल्ह्यातील दोन एक्साईज निरीक्षकांपैकी गोंदियाच्या निरीक्षकांनी या आदेशावर कोणतीच कारवाई केली नाही. मनुष्यबळ नसण्याची ही समस्या गेल्या दोन वर्षांपासून अशीच आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा प्रकार त्या बारमालकांना संरक्षण देणारा असून त्यांच्याशी असलेल्या जवळीकतेतूनच कारवाई करण्याचे टाळले जात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. राज्य आणि राष्ट्रीय महामार्गापासून कोणतेही वाईन बार (परमीट रूम) अनुक्रमे ५० आणि ७५ मीटरपेक्षा जास्त अंतरावर असणे गरजेचे आहे. या नियमात न बसणाऱ्या बारचा परवाना रद्द करण्यात यावा असा आदेश उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी दोन वर्षांपूर्वी दिला. त्यानुसार गोंदिया व देवरीच्या निरिक्षकांना वारंवार स्मरणपत्र देऊनही त्यांच्याकडून कारवाई का होत नाही, हे न उलगडणारे कोडे आहे. विशेष म्हणजे देवरीच्या निरीक्षकांनी डिसेंबर २०१४ मध्ये पाठविलेल्या अहवालावरही अद्याप कारवाई झालेली नाही. (जिल्हा प्रतिनिधी)