शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यात तीन तालुक्यातील आठ महसूल मंडळात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 15:24 IST

गोंदिया जिल्हावासीयांना गेल्या २४ तासात पडलेल्या पावसाने थोडा दिलासा मिळाला असून १५६२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देदोन तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंदउर्वरित तालुक्यांना प्रतीक्षा कायम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील दोन महिन्यांपासून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या गोंदिया जिल्हावासीयांना गेल्या २४ तासात पडलेल्या पावसाने थोडा दिलासा मिळाला असून १५६२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आठ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून गोरेगाव आणि आमगाव तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. मात्र उर्वरित सहा तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

हवामान विभागाने जिल्ह्यात बुधवारपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. तो अंदाज काहीसा खरा देखील ठरला आहे.बुधवारी (दि.५) सायंकाळपासूनच जिल्ह्यात सर्वत्र पावसाची रिपरिप कायम होती. रात्रीच्या सुमारास गोंदिया,आमगाव,गोरेगाव या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या तिन्ही तालुक्यातील नदी, नाले भरुन वाहत होते. आमगाव-कालीमाटी मार्गावरील नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने हा मार्ग काही तासांसाठी बंद झाला होता. तर आमगाव शहरातील काही वस्त्यांमध्ये सुध्दा पाणी साचल्याने नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.

गोरेगाव येथे वार्ड क्रमांक १३ मध्ये नगर पंचायतच्या चुकीच्या बांधकामामुळे पाणी साचल्याने वाडार्तील नागरिकांची गैरसोय झाली. मात्र पावसामुळे या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी हजारो हेक्टरवरील रोवणी खोळंबली होती. तर केलेली रोवणी सुध्दा वाळण्याच्या मार्गावर होती यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र बुधवारी झालेल्या पावसामुळे शेतकºयांना थोडा दिलासा मिळाला आहे. अजुर्नी मोरगाव, सडक अजुर्नी, तिरोडा, देवरी आणि सालेकसा तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याने या तालुक्यातील नागरिकांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

या महसूल मंडळात झाली अतिवृष्टीगेल्या २४ तासात गोंदिया तालुक्यातील कामठा महसूल मंडळात ७६ मिमी, गोरेगाव तालुक्यातील गोरेगाव १७१.२० मिमी, कुºहाडी १६२.६० मिमी, मोहाडी ११०.१० मिमी तर आमगाव तालुक्यातील कट्टीपार १५१ मिमी, आमगाव १०९ मिमी, तिगाव ९८.८० मिमी, १३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर आमगाव १२२.२० मिमी, गोरेगाव तालुक्यात सर्वाधिक १४७.९७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रोवणीच्या कामाला वेगपावसाअभावी मागील महिनाभरापासून रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली होती. बुधवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या पावसामुळे करपण्याच्या मार्गावर असलेल्या पºह्यांना संजीवनी मिळाली. आमगाव, गोरेगाव, सडक अजुर्नी आणि गोंदिया तालुक्यातील रोवणीच्या कामाला वेग आला आहे. आतापर्यंत सर्वात कमी पावसाची नोंद अजुर्नी मोरगाव तालुक्यात झाली असून येथील शेतकºयांना अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. 

टॅग्स :Rainपाऊस