शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

खताच्या बॅगची जादा,दराने विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:23 IST

लोहारा : शेतीसाठी महत्त्वाचा घटक असलेल्या रासायनिक खतांना आता चांगलीच मागणी वाढली असून त्याचा गैरफायदा घेत देवरी तालुक्यातील काही ...

लोहारा : शेतीसाठी महत्त्वाचा घटक असलेल्या रासायनिक खतांना आता चांगलीच मागणी वाढली असून त्याचा गैरफायदा घेत देवरी तालुक्यातील काही कृषी केंद्रावर वाढीव दराने रासायनिक खतांची विक्री केली जात आहेत. काही ठिकाणी तर सबसिडीच्या नावावर आधार लिंकिंग केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची लूट सुरूच असल्याचे चित्र आहे.

दरवर्षी साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खरीप हंगामाची पेरणी सुरू होते. त्यादृष्टीने शेतकऱ्यांकडून बियाणे, खते, कीटकनाशके यांचे नियोजन केले जाते. यामध्ये मृग नक्षत्रात पेरणी झाल्यानंतर काही दिवसांनी खताची मात्रा द्यावी लागते. त्यात खताची टंचाई असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना दरवर्षीच येतो. त्यामुळे खरीप हंगामापूर्वी खताचेही नियोजन आता केले जात आहे. त्यात केंद्र सरकारने खताच्या किंमती भरमसाठ वाढविल्याने शेतकरी चिंतीत झाला आहे. त्यानंतर केंद्र सरकारनेच खतांच्या अनुदानात वाढ केली. त्यामुळे रासायनिक खते पूर्वीच्याच किंमतीत विक्री करावे असे निर्देश देण्यात आले. याविषयी तालुक्यात पाहणी केली असता अनेक कृषी केंद्रांवर नव्या वाढीव दराने खतांची विक्री केली जात असल्याचे पहावयास मिळाले. याविषयी शेतकऱ्यांनी देखील जादा दराने खत घेतल्याचे सांगत आहे. एकीकडे सरकार व कृषी विभागाने खताच्या सुरळीत पुरवठ्यासाठी नियोजन केले असले तरी अनेक ठिकाणी खत शिल्लक नाही. २ बॅग इतर खत घ्या तरच एक बॅग युरिया खत देण्यात येणार असे सांगून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. काही दुकानदार तर खत नसल्याचे स्पष्ट सांगत असून यासोबतच सरकारने ठरवून दिलेल्या किंमतीपेक्षा ज्यादा दर घेतले जात असल्याचे दिसत आहे. तर तालुक्‍यातील सर्व कृषी सेवा केंद्राना मुळ रकमेनुसारच खतविक्री करण्याच्या सक्त सूचना दिल्याचे तालुका कृषी अधिकारी जी.जी. तोडसाम यांनी सांगितले आहे.

---------------------------------

अशी सुरू आहे दिशाभूल

खत विक्री केंद्रावर १०:२६:२६ या खताची मागणी केली असता यासोबत ग्रॅनुअल घ्यावे लागेल. ते घेण्यास नकार दिला असता त्याशिवाय काहीच मिळणार नाही असे स्पष्टपणे सांगण्यात येते. ज्या खताची आवश्यकता असताना इतर खत घ्यावे लागत असल्याने त्यातून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. तर काही केंद्रात खताचा साठा संपला आहे असे सांगीतले जात आहे. डीएपी, १५:१५:१५ खत मिळावे यासाठी वाढीव रक्कम देण्यास तयार आहे, असे सांगितले मात्र तरी देखील खत उपलब्ध नसल्याचे सांगून परत पाठविले जात आहे. तर काही केंद्रांत ग्रुॅमरल २०:२०:०:१३ या खतासाठी १०५० रुपये तर डीएपीसाठी १४०० रुपये लागतील असे सांगतले जात आहे. मुळात त्यांची किंमत कमी असतानाही वाढीव रक्कम घेऊन शेतकऱ्यांची लूट सुरू आहे.

----------------------

कोट

तालुक्यातील कोणत्याही शेतकऱ्यांची लेखी तक्रार कार्यालयात आलेली नाही. शेतकऱ्यांनी लेखी तक्रार कार्यालयात केल्यानंतर आम्ही भरारी पथकाद्वारे कारवाई करुन संबंधित कृषी केंद्राचे परवाने रद्द करू.

जी.जी.तोडसाम

तालुका कृषी अधकारी, देवरी