शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट बांधकामाचे उत्कृष्ट उदाहरण

By admin | Updated: January 17, 2015 01:51 IST

जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या सडक अर्जुनी उपविभागीय कार्यालयाअंतर्गत कोहमारा ते कोलारगाव रस्त्याचे काम कंत्राटदारांमार्फत पूर्ण करण्यात आले.

सौंदड-रेल्वे: जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या सडक अर्जुनी उपविभागीय कार्यालयाअंतर्गत कोहमारा ते कोलारगाव रस्त्याचे काम कंत्राटदारांमार्फत पूर्ण करण्यात आले. या रस्त्याचे कारपेट सिलकोटचे काम झाले असून हे काम ८०० मिटरचे आहे. मात्र या कामात तांत्रिकदृष्ट्या तृट्या असल्याचे स्पष्टपणे दिसून येत असल्याने हे काम किती दर्जेदार होईल यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे या गावातून जाणाऱ्या रस्त्याच्या कामाची कल्पना ग्रामपंचायतलाही नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.रस्त्याचे कारपेट व सिलकोटचे काम करण्यापूर्वी प्रथम बीबीएम व झालेल्या रस्याची ब्रशच्या सहायाने किंवा प्रेशर मशीनच्या सहायाने रस्त्यावरील धुळ स्वच्छ करावयास पाहिजे. परंतु हे काम करताना धूळ स्वच्छ करण्यात आली नाही. धूळ स्वच्छ केल्यानंतर झाऱ्याच्या सहाय्यााने रस्त्यावर डांबराचे टॅपकोट करावयाचे असते. परंतु कंत्राटदाराने तेही केले नाही. रस्ता धुळरहित झाल्यानंतर त्याच्यावर चुरी व डांबर एकत्रित करुन कोल्ड मिक्स कारपेट करण्यात आले नाही. या कोल्ड मिक्स कापरेटमध्ये ७५ टक्के रॉकेल तेल व २५ टक्के डांबर वापरुन कारपेटचे काम करण्यात आले.कोल्ड मिक्स कारपेट झाल्यानंतर टॅपकोडचे काम करताना प्रथम झाऱ्याने रस्त्यावर डांबर मारावयास पाहिजे. परंतु कंत्राटदाराने असे न करता सरळ राखडमिश्रित डस्ट मारली आहे. वास्तविक येथे दाणेदार गिरीट वापरायला पाहिजे, परंतु या रस्त्याचे काम कोणत्याच तांत्रिक नियमानुसार केलेले नाही. त्यामुळे हे काम म्हणजे निकृष्टपणाचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे बोलले जात आहे. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या रस्त्याची तपासणी करुन शासकीय गुणवत्तेनुसार काम आहे की नाही याची खातरजमा करुन दोषी कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी सरपंच, उपसरपंच व गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)