गोरेगाव : आदर्श ग्राम योजनेंतर्गत खा.प्रफुल्ल पटेल यांनी निवडलेल्या तालुक्यातील पाथरी गावात आतापर्यंत झालेल्या कामांची व उपक्रमांची पाहणी रविवारी (दि.१३) पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव कुदले यांनी केली. तसेच अंमलबजावणीकरीता येणाऱ्या अडचणींबाबत जि.प.च्या यंत्रणेशी सविस्तर चर्चा केली.पाथरी या गावाला खा.पटेल यांनी खासदार दत्तक योजनेंतर्गत ‘आदर्श ग्राम’ करण्यासाठी निवड केली आहे. सदर योजनेत विविध शासकीय योजना राबवायच्या असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या कोणकोणत्या योजना या गावात राबविल्या, कोणकोणत्या योजनांचा लाभ सांसद आदर्श ग्राम पाथरीला देता येईल, यासाठी उपसचिव शा.सि. कुदळे यांनी पाथरीला भेट देऊन पाहणी केली. यावेळी जि.प.चे वरिष्ठ भूवैज्ञानिक काझी, पं.स.चे खंडविकास अधिकारी डी.बी. हरिणखेडे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे जितेंद्र येरपुडे, दिशा मेश्राम, सूर्यकांत रहमतकर, राजेश उखळकर, भागचंद रहांगडाले, देवानंद बोपचे, नीलकमल डहाट, सरपंचा ममता जनबंधू, उपसरपंच संजय कटरे, डॉ.सुरेश तिरेले, नरेश मालाधारी, मानेश्वर जनबंधू, डिलेश्वरी तिरेले, टोलीराम कटरे, कुवरलाल भोयर, तिलका गदवार, ज्ञानेश्वर शहारे, अयुब कुरैशी, हरेंद्र टेंभुर्णीकर, ग्रामसेवक सी.ए.रहांगडाले आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)बघेले यांनी मांडल्या समस्या४यावेळी पं.स. सदस्य केवलराम बघेले यांनी गावात कोणकोणत्या योजना सुरू आहेत, आणखी कोणकोणत्या योजनांची अंमलबजावणी गावात करता येणार याविषयी त्यांना माहिती दिली. गावाला लागून कटंगी जलाशय असूनही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नसल्याने पाथरी येथील शेतकरी अजूनही हलाखीचे जीवन जगत आहेत. गावात उपसा सिंचन योजना सुरू करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. ४गावातील पाणीपुरवठा योजना ही सौरऊर्जेवर चालविण्याची तसेच गावात शुध्द पाण्याचा पुरवठा होण्यासाठी वॉटर फिल्टर योजना सुरू करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. त्याचप्रमाणे गावाला विशेष बाब म्हणून सरसकट सर्वांना शौचालय देण्याची मागणीही बघेले यांनी यावेळी उचलून धरली.
आदर्श ग्राम पाथरीची उपसचिवांकडून पाहणी
By admin | Updated: December 15, 2015 03:52 IST