आॅनलाईन लोकमतबोंडगावदेवी : केंद्र व राज्यातील विद्यमान सरकारने सर्वसामान्य, गोरगरीब, कष्टकरी, शेतकऱ्यांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून राजकीय सारीपाट काबीज केले. मात्र सत्तासुख येताच त्यांना आपल्या वचनाची पूर्तता करण्याचा विसर पडला. आजघडीला गावातील शेतकरी, कष्टकरी सामान्य जनता पावलोपावली नाडवल्या जात आहे. कर्जाच्या ओझ्याखाली राहून मानसिक तणावात जीवन जगत आहे. एकंदरीत जगाचा पोशिंदा समजला जाणारा शेतकरी विद्यमान सरकारच्या काळात बेदखल होत आहे, असे प्रतिपादन इंजि. आनंदकुमार जांभुळकर यांनी केले.न्यू स्टॅन्डर्ड मिलिंद नाट्य संपदा कोरंभीटोला येथे राजविलास थिएटर्स वडसा निर्मित ‘आई तुच माझी सावली’ या कौटुंबिक नाट्यप्रयोगाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रशिक विद्यालयाचे संस्थापक अनंतकुमार रामटेके होते. वडसाच्या माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांच्या हस्ते रंगदेवतेची पूजा केल्यानंतर इंजि. जांभूळकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने प्राचार्य वंजारी, संजय नाकाडे, कंत्राटदार भगवान नाकाडे, टेंभुर्णे, नाना शहारे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.जांभुळकर पुढे म्हणाले, जीवन जगत असताना मानवी समुदायाला मनोरंजनही आवश्यक असते. नाट्य चळवळीतून समाजप्रबोधनास मोठा हातभार लागतो. या चळवळीतून समाज परिवर्तन सहज शक्य होते. आज देशात भयाव् ाह परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी देशाच्या संविधानामुळे गावपातळीवरील सामान्य माणूस सन्मानाने जीवन जगत आहे. शेतकºयांना कर्जमाफीची फळे चाखता येत नाही. या बाबी सामान्यांनी ओळखून आतातरी सतर्क राहणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येत कोरंभीटोलावासी उपस्थित होते.
जगाचा पोशिंदाच बेदखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 21:36 IST
आॅनलाईन लोकमतबोंडगावदेवी : केंद्र व राज्यातील विद्यमान सरकारने सर्वसामान्य, गोरगरीब, कष्टकरी, शेतकऱ्यांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून राजकीय सारीपाट काबीज केले. मात्र सत्तासुख येताच त्यांना आपल्या वचनाची पूर्तता करण्याचा विसर पडला. आजघडीला गावातील शेतकरी, कष्टकरी सामान्य जनता पावलोपावली नाडवल्या जात आहे. कर्जाच्या ओझ्याखाली राहून मानसिक तणावात जीवन जगत आहे. एकंदरीत जगाचा ...
जगाचा पोशिंदाच बेदखल
ठळक मुद्देआनंदकुमार जांभुळकर : कोरंभीटोला येथे ‘आई तुच सावली’चा नाट्यप्रयोग