शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

मोहीम यशस्वीतेसाठी सर्वांचा सहभाग आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 21:17 IST

गोवर हा अत्यंत संक्रामक आणि घातक आजार आहे. गोवर आजाराचे निर्मुलन व रुबेला आजारावर नियंत्रण करण्यासाठी या मोहिमेची सुरुवात २७ नोव्हेंबरपासून होणार आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून समाजामध्ये या मोहिमेबाबत जागरु कता व सुरिक्षतता निर्माण करण्यासाठी या मोहिमेत पालकांनी, शिक्षकांनी व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.

ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : गोवर-रुबेला लसीकरण मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोवर हा अत्यंत संक्रामक आणि घातक आजार आहे. गोवर आजाराचे निर्मुलन व रुबेला आजारावर नियंत्रण करण्यासाठी या मोहिमेची सुरुवात २७ नोव्हेंबरपासून होणार आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून समाजामध्ये या मोहिमेबाबत जागरु कता व सुरिक्षतता निर्माण करण्यासाठी या मोहिमेत पालकांनी, शिक्षकांनी व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.गोवर रुबेला लसीकरण मोहिमेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या वेळी त्या बोलत होत्या. बैठकीला जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पी. बी. खंडाते, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.व्ही.पी.रुखमोडे उपस्थित होते.बलकवडे म्हणाल्या, सर्वप्रकारच्या जिल्हास्तरीय व गाव पातळीवरील आढावा सभा आणि कार्यशाळा घेवून आपण आपली जबाबदारी समजून गोवर रुबेला लसीकरण मोहिमेबाबत जनजागृती करु न व्यापक प्रमाणात प्रचार-प्रसिध्दी करावी. समाजामध्ये या मोहिमेबाबत जागरु कता व सुरक्षीतता निर्माण करु न प्रत्येकाने आपल्या मुला-मुलींना दोन्ही रोग होण्यापासून वाचवावे. ही मोहिम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी जिल्हा आरोग्य प्रशासनाला सहकार्य करावे.ज्यामुळे जिल्ह्यातील एकही बालक गोवर रुबेला लसीकरणापासून वंचित राहणार नाही.डॉ. दयानिधी म्हणाले, गोवर रुबेला लसीकरण मोहिमेअंतर्गत ९ महिने ते १५ वर्षापर्यंत जवळपास ३ लाख ६० हजार ३५ लाभार्थ्याचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. निश्चित लाभार्थीपैकी जरी या अगोदर गोवर रुबेला लस दिली असेल तरी त्या बालकांना लसीकरण करावयाचे आहे. मोहिमेचा शुभारंभ २७ नोव्हेंबरला झाल्यानंतर ४ ते ५ आठवड्याचा कालावधीत मोहीम पूर्ण करण्यात येणार आहे.निर्धारित करण्यात आलेल्या एकूण लाभार्थीपैकी ६० ते ६५ टक्के लाभार्थी हे शाळेत जाणारे विद्यार्थी असल्यामुळे आरोग्य विभागाच्या मदतीने सर्व शाळांमध्ये पहिल्या २ ते ३ आठवड्यात लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे.त्यानंतर उर्वरित ३५ ते ४० टक्के लाभार्थीचे लसीकरण अंगणवाडी केंद्र व नियमीत लसीकरण सत्राच्या किंवा उपकेंद्राच्या ठिकाणी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. बैठकीला विविध विभागांचे अधिकारी व स्वंयसेवी संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्टया लसीकरण मोहिमेअंतर्गत सर्व लाभार्थ्याला गोवर रु बेला लसीचे एक इंजेक्शन देण्यात येणार असून ग्रामीण व नागरी भागामध्ये १०० टक्के लाभार्थ्याना लसीकरण करणे आवश्यक आहे.१७२० शाळांमध्ये लसीकरणजिल्ह्यातील १ हजार ७२० शाळांमध्ये गोवर रुबेला लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी ४९८ लस टोचक तयार करण्यात आले. तसेच ९३० शाळाबाह्य विद्यार्थ्यांना ही लस देण्यात येणार आहे.