शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

रोजच होतो एसटीतून राजकीय प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 22:08 IST

निवडणूक मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे कोणता उमेदवार बाजी मारेल, अशा रंगतदार चर्चा एसटीच्या प्रवासात ऐकायला मिळत आहेत.

ठळक मुद्देसाहेब किती उमेदवार दिलेली आश्वासन पाळतात जी?गोरेगाव ते तिरोडा 40 किमी

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : निवडणूक मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे कोणता उमेदवार बाजी मारेल, अशा रंगतदार चर्चा एसटीच्या प्रवासात ऐकायला मिळत आहेत.गोंदिया-गोरेगाव- तिरोडा मार्गावरील एसटीच्या प्रवासातील एका म्हातारीने निवडणुकीच्या संदर्भात सांगितलेले संदर्भ बरेच काही सांगणारे आहे. भंडाऱ्याचे दोन्ही उमेदवार गाव विकासासाठी माझ्या घरी येतील का? हा आजीबाईने केलेला प्रश्न, वेळीच या प्रश्नावर टोमना मारणारा एसटी प्रवाशी म्हणाला. सर्वच उमेदवार निवडणुकीच्यावेळी आश्वासने देतात पण पुढे त्या आश्वासनाची साधी दखल घेत नाही.गोरेगाववरुन तिरोडाला जात असलेले उद्योगपती कांतीलाल कटरे यांनी काँग़्रेसचा कार्यकाळ बरा असल्याचे सांगत मोदी प्रधानमंत्रीच असायला पाहिजे अशी दुहेरी भूमिका घेतली. ते पुढे म्हणाले या लोकसभेला गोंदिया जिल्ह्यातील बहुसंख्य असलेला पोवार समाजाला तिकीट मिळाली नसल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. गोरेगाव-तिरोडा विधानसभा क्षेत्रात बरीच विकासाची कामे झाली. पण आजही अनेक गावे विकासापासून कोसो दूर आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणी नाही. या क्षेत्रात शेतीसाठी पाण्याची व्यवस्था व्हावी, अशी मागणीही या प्रवासात पुढे आली. लोकसभा निवडणुकी विषयी पाहिजे तेवढी उत्सुकता नाही. जवळपास बºयाच मतदारांना मतदानाची तारीख व उमेदवार यांच्याविषयी काहीच माहिती नाही. काचेवानी येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलनातील एक कार्यकर्ता एसटीत भेटला, म्हणाला साहेब आम्ही पेशीवर गेलो, आंदोलन झाले, पण या आंदोलनातून शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. एका प्रवाशांने म्हटले की भाजपाने सर्वसामान्यांच्या हितासाठी विशेष असे काय केले, तेव्हा मध्येच उठलेल्या प्रवाशाने पुलवामा हल्याविषयी माहिती दिली.मोदी सरकार होत म्हणूनच पाकीस्तानाचे कंबरडे मोडले असे लगेच उत्तर दिले. तर दुसऱ्या प्रवाशांना सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या कायम असल्याचे सांगितले.शेतकऱ्यांचे सरकार यावे असा मतदारांचा सूरगोंदिया ते रजेगाव16 किमीलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी गोंदिया जिल्ह्यातील एकही उमेदवार नसला तरी आता एसटीतून राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. परंतु चर्चा करतांना प्रत्येकाच्या तोंडून जर हा उमेदवार असता तर विक्रमी मताधिक्यांनी निवडून आला असता असा सूर एसटीतील प्रवाशांच्या तोंडून प्रवासादरम्यान ऐकू येत आहेत.राष्टÑवादी काँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारात थेट लढत आहे. ह्या दोन्ही पक्षाचे उमेद्वार भंडारा जिल्ह्यातीलच असल्यामुळे सुरूवातीला गोंदियातील मतदारांना पाहिजे तसा रस नव्हता. परंतु निवडणुकीचे दिवस जसे-जसे जवळ येत आहेत. तसे-तसे लोकही निवडणुकीत रस घेत आहेत. चर्चा करता-करता लोक आपल्या पक्षाच्या उमेद्वाराला घेऊन हमरी-तुमरीवरही उतरत आहेत. काही मोदींच्या नावाने खडे फोडत आहेत. तर काही त्यांचे कट्टर समर्थन करतांना एसटीच्या प्रवासात आढळले. काहींनी स्थानिक मुद्यांवर लक्ष वेधले.तर राष्ट्रीय स्तरावरील मुद्यांना घेऊन राजकीय रंग एसटीत चढला. १६ किमीच्या प्रवासात गोंदियापासून रजेगाव कधी आले हे कळलेच नाही. शेतकऱ्यांची सरकार कधी येणार अशी आशा त्या चर्चेतून पुढे आली. चर्चे दरम्यान काही प्रवाशांनी अद्यापही आमच्या गावापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे बांधकाम झाले नसल्याने एसटी पोहचत नसल्याचे सांगितले. तर एका शेतकरी प्रवाशांने अद्यापही सिंचन प्रकल्प पूर्ण झाले नसल्याने उन्हाळी पीक घेण्यास अडचण जात असून याची दखल निवडून आल्यानंतर उमेदवार घेणार का असा सवाल केला.एकंदरीत बसमध्ये विविध मुद्यांवर राजकीय चर्चा रंगली असून अशी चर्चा मागील आठ दहा दिवसांपासून बसमध्ये दररोज रंगत असल्याचे वाहक सांगण्यास विसरला नाही.

वाढते प्रदूषण; रोजगाराची समस्याअर्जुनी मोरगाव ते गोंदिया80 किमीलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील लोकांचा मागोवा घेण्यासाठी अर्जुनी ते गोंदिया असा एसटीने प्रवास करीत असतांना एसटीमधील प्रवाशी राजकारणावर चर्चा करताना प्रदूषणावर बोलून रोजगाराची कशी समस्या आहे. सुशिक्षित बेरोजारांची फौज कशी तयार होत आहे.रोजगार देणारे शासन बेरोजगारांना निव्वळ पोकळ आश्वासनांची खैरात वाटत असेल आणि कृती काहीच नसेल तर असे सरकार का निवडून द्यायचे हा मुद्दा प्रकर्षाने जाणवला.दीड वर्षापूर्वी गोंदियाच्या एका रिसोर्टमध्ये गोंदिया जिल्ह्यातील ३० हजार बेरोजगार तरूणांना रोजगार देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. विविध नामवंत कंपन्यांना बोलाविण्यात आले होते. त्या कंपन्यांनी फक्त अर्ज घेऊन तुम्हाला फोन करून बोलावले जाईल असे अर्ज करणाऱ्या उमेद्वारांना सांगितले होते. परंतु त्या महामेळाव्यातील किती बेरोजगारांना रोजगार मिळाला हे पाहिले तर फक्त देखावा करण्यासाठी असे मेळावे आयोजित केले जातात अशी चर्चा होती.नोकरीच्या नादापायी मुलगा शिक्षण घेतो. परंतु शिक्षण घेऊनही नोकरी लागली नाही किंवा रोजगार मिळाला नाही तर नैराश्य झालेले तरूण शिक्षणाचा दर्जा पाहून शेतीतही काम करण्याची तयारी दाखवित नसल्याची खंत एका मतदार बापाने बोलून दाखविली. आम्ही मागील अनेक वर्षांपासून धानाला योग्य हमी देण्याची मागणी करीत आहोत मात्र ही मागणी सुध्दा अद्याप पूर्ण झालेली नाही.तर झाशीनगर प्रकल्पाचे भिजत घोंगडे कायम असल्याने रब्बी पीक घेण्यासाठी अडचण होते, त्यामुळे या आमच्या समस्या या निवडणुकीने सुटणार आहेत का? असे दोन शेतकरी प्रवाशी आपसात बोलत होते.स्थानिक समस्या वाटल्या महत्वाच्यारोजगार ही महत्त्वाची समस्या बेरोजगार तरूणांबरोबर त्यांच्या पालकांनाही वाटत आहे.आश्वासनांच्या व्यतिरिक्त नेते काहीच देत नाही. गरीबांचा, बेरोजगारांचा कैवारी कुणीच नाही असा समज त्या मतदारात दिसून आला.नेता जेवढा दमदार तेवढा त्या क्षेत्राला फायदा होत असतो. परंतु लोकसभेच्या निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांबद्दल फारसा उत्साह आढळला. परंतु मतदान आपला हक्क असल्याने मतदान जरूर करू असेही एसटीतील प्रवासी म्हणत होते.