शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक संकटसमयी काँग्रेस शेतकºयांच्या पाठीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 21:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा प्रशासनाकडून सरकारला खूश करण्यासाठी रोवणीचे वाढीव आकडे पाठविले जात आहे. यात मात्र गरीब शेतकºयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सरकारकडे रोवणीचे खरे आकडे पाठवावे अन्यथा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. तर प्रत्येक संकटसमयी भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस त्यांच्या पाठिशी उभी असल्याचे आश्वासन देत त्यांना ...

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : दुष्काळग्रस्त गावांचा केला दौरा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा प्रशासनाकडून सरकारला खूश करण्यासाठी रोवणीचे वाढीव आकडे पाठविले जात आहे. यात मात्र गरीब शेतकºयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सरकारकडे रोवणीचे खरे आकडे पाठवावे अन्यथा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. तर प्रत्येक संकटसमयी भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस त्यांच्या पाठिशी उभी असल्याचे आश्वासन देत त्यांना आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दिलासा दिला.जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची आमदार अग्रवाल यांनी बुधवारी (दि.१६) पाहणी केली. यादरम्यान ग्राम तेढवा येथे शेतकºयांशी चर्चा करताना ते बोलत होते. आमदार अग्रवाल यांनी, जिल्ह्यातील ग्राम दासगाव खुर्द, दासगाव बू., निलज, तेढवा यासह अन्य गावांचा दौरा करून वर्तमान स्थिती जाणून घेतली.याप्रसंगी शेतकºयांनी, परिसरातील बहुतांश शेतकºयांची खार (रोपे) मरत असल्याचे सांगीतले. अशात आता पाऊस आला तरिही दुबार पेरणीची त्यांची आर्थिक परिस्थिती नाही. त्यात कृषी व सिंचन विभागाकडून काहीच मदत मिळत नसल्याचेही शेकतºयांनी सांगीतले.अगोदरच शेतकरी आर्थिक अडचणीत असताना १० हजार रूपयांचे तातडीचे कर्ज मिळाले नाही. शिवाय आॅनलाईन पिक विमा न झाल्याने पूर्णपणे अडकल्याची व्यथा शेतकºयांनी आमदार अग्रवाल यांच्यापुढे मांडली.याप्रसंगी आमदार अग्रवाल यांच्यासोबत जिल्हा कृषी अधीक्षक अनिल इंगळे, तहसीलदार चव्हाण, पंचायत समिती सभापती माधुरी रहांगडाले, सदस्य अनील मते, बाजार समिती संचालक आनंद तूरकर, गोविंद तूरकर यांच्यासह कृषी विभागाचे अन्य अधिकारी होते.मुख्यमंत्र्याकडे मांडली वास्तविकतास्वत: केलेली पाहणी व शेतकºयांची व्यथा जाणून घेतल्यानंतर आमदार अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर संपर्क साधला. यात त्यांनी, जिल्हाधिकाºयांकडून ५० टक्के रोवणीचे आकडे दिले जात असताना, प्रत्यक्षात ३०-३५ टक्क्यांपेक्षा जास्त रोवणी झाली असल्याची माहिती दिली. तर झालेली रोवणीही पाण्याअभावी करपत चालली असून जिल्ह्यातील नदी, नाले व तलाव कोरडे आहेत. त्यामुळे भविष्यात जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होणार असल्याचे सांगत जिह्यातील वास्तवीकतेशी अवगत करविले.