शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
3
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
4
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
5
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
6
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
7
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
8
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
9
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
10
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
11
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
12
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
13
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
14
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
15
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
16
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
17
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
18
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
19
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
20
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली

प्रत्येक बालमजूर पालकाने आधारकार्ड काढावे

By admin | Updated: September 30, 2016 02:00 IST

प्रत्येक बालमजूर पालकाने आधारकार्ड बनविणे गरजेचे आहे. कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड आवश्यक आहे,

एन.एन. मेश्राम : बालमजूर पालकांचा मेळावागोंदिया : प्रत्येक बालमजूर पालकाने आधारकार्ड बनविणे गरजेचे आहे. कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड आवश्यक आहे, असे मार्गदर्शन वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.एन. मेश्राम यांनी केले.राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प समिती जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत मुंडीकोटा येथील घोगरा चौकीमधील बालमजूर विशेष प्रशिक्षण केंद्रात झालेल्या पालक मेळाव्यात त्या बोलत होत्या. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राला माल्यार्पण व दीप प्रज्ज्वलन करून मेळाव्याची सुरूवात झाली. उद्घाटन सरपंच गीता देव्हारे यांच्या हस्ते, मुंडीकोटा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.एन. मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अतिथी म्हणून प्रकल्प संचालक महेंद्र रंगारी, ए.एम. चामट, मुख्याध्यापक सी.बी. अंबुले, प्रकल्प समन्वयक नितिन डबरे, टी.एम. डोहळे, प्रकाश शेंडे उपस्थित होते.प्रास्ताविकातून रंगारी यांनी, कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहू नये, यासाठी शासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात. सदर केंद्रातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी-सवलतीबाबत माहिती देवून प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना दररोज केंद्रात पाठवावे व घरीदेखील त्यांच्या शिक्षणाबाबत माहिती द्यावी, असे सांगितले. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शेंडे यांनी, मांगगारोडी समाजात शिक्षणामुळे काय बदल होवू शकते, याबद्दल माहिती दिली. मुख्याध्यापक सी.बी. अंबुले यांनी राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प समितीमार्फत होणाऱ्या कार्याची प्रसंशा केली व सदर प्रकल्पामुळे अशा विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक बालपण वाचविण्यास मदत होईल, असे सांगितले. केंद्रप्रमुख ए.एम. चामट यांनी, पालकांनी काळानुरूप बदलून आपल्या मुलांकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. तर सरपंच गीता देव्हारे यांनी मांगगारूडी समाजात असणाऱ्या अंधश्रद्धेबाबत मत व्यक्त करून, शिक्षणामुळे अंधश्रद्धेतून मुक्ती मिळेल, असे मार्गदर्शन केले.संचालन खेमराज कटरे यांनी केले. आभार मुनेश्वर शेंडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी विशेष संक्रमण केंद्राचे संदीप सोनवाने, सुनिता भांडारकर, दिलीप बिसेन, माधुरी कंगाले यांनी सहकार्य केले. याप्रसंगी बालक कामगारांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)