शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर आमगावला नगर परिषदेचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 00:45 IST

आमगाव नगरपंचायतला नगर परिषदेला दर्जा देण्यात यावा. या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष समितीने लढा उभारला होता.

ठळक मुद्देआठ ग्रामपंचायतींचा समावेश, शासनाने काढली अधिसूचना : संघर्ष समितीच्या लढ्याला यश

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : आमगाव नगरपंचायतला नगर परिषदेला दर्जा देण्यात यावा. या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष समितीने लढा उभारला होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून शासनाने आमगावला नगर परिषदेचा दर्जा देण्यात आल्याची अधिसूचना काल २ आॅगस्ट रोजी काढली. या निर्णयाने आमगाववासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.राज्य शासनाने राज्यातील अनेक तालुका पातळीवरील ग्रामपंचायतींना लोकसंख्या व ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्राचा समावेश करुन होणारे क्षेत्र यांचे नगर पंचायतीत समायोजन करुन नगर पंचायतची स्थापना २०१५ केली होती. परंतु, आमगाव येथील नागरिकांनी नगर पंचायत ऐवजी शासनाने नगर परिषदेचा दर्जा द्यावा अशी मागणी लावून धरली. यासाठी संघर्ष समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने शासनाने नगर परिषद स्थापनेचा निर्णय शासनाकडे सोपविला. परंतु, शासनाने मागील दोन वर्षांपासून यासंदर्भात कुठलाच निर्णय घेतला नव्हता.निर्णयाअभावी नागरिकांना प्रशासकाच्या अनियंत्रीत कारभारामुळे विकासापासून वंचित राहावे लागले. संघर्ष समितीने शासनाकडे नगर परिषदेचा दर्जा देण्यात यावा. या मागणीसाठी अनेक पत्र व्यवहार व आंदोलनाची भूमिका घेतली होती. संघर्ष समितीने राजकीय नेते, लोकप्रतिनिधी यांनाही या संदर्भात सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रयत्न केले. अखेर शासनाने आमगाव नगर परिषद स्थापनेचा निर्णय घेत काल (दि.२) रोजी त्याची अधिसुचना काढली. शासनाने विकासाच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले.विकासाकरिता संघर्ष कायम राहणारआमगाव परिसरातील नागरिकांच्या मागणीला घेवून नगर परिषद करिता संघर्ष समितीचा लढा सुरू होता. नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा आणि विकासासाठी नगर परिषद हा गतीशील पर्याय होता. यासाठी संघर्ष समितीने पुढाकार घेवून पाठपुरावा केला. आंदोलनाची भूमिका घेतली होती. याची दखल घेत शासनाने योग्य निर्णय घेतला. पुढे नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांना मुलभूत विकासाकरिता पुढाकार राहणार नाहे.आठ ग्रामपंचायतीचा समावेशआमगाव नगर परिषदेत आमगाव, बनगाव, रिसामा, कुंभारटोली, माल्ही, पदमपूर, किंडगीपार, बिरसी या आठ ग्राम पंचायतींना ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रात समावेश करुन नगर परिषदची स्थापना करण्याचे परिपत्रक काढले.नगर परिषदेच्या प्रशासकपदी तहसीलदारशासनाने आठ ग्रामपंचायतींचा नगर परिषदेत समावेश केला. या ठिकाणी निवडणूक कार्यक्रमाची अंमलबजावणी व या गावातील विकासात्मक कार्य सुरळीतपणे चालविण्यासाठी प्रशासकपदी आमगावचे तहसीलदार साहेबराव राठोड यांच्याकडे कार्यभार सोपविला आहे.लोकप्रतिनिधींचा यशस्वी पाठपुरावाआमगाव नगर परिषद व्हावी, यासाठी नागरिकांच्या मागणीला घेवून आ. संजय पुराम, माजी आ. केशवराव मानकर यांनी हा विषय प्रतिष्ठेचा केला होता. शासनाने अखेर आमगाववासीयांच्या मागणीची दखल घेतली. यामुळे आमगावच्या विकासाला निश्चित दिशा मिळण्यास मदत होईल. यात आमगाव येथील अ‍ॅड. येशुलाल उपराडे, क्रिष्णा चुटे, राकेश शेंडे यांचीही भूमिका महत्त्वपूर्ण ठरली.