शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
3
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
4
चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
5
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
6
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
7
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
8
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
9
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
10
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
11
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
12
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
13
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
14
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
15
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
16
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
17
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
18
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
19
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

‘लॉकडाऊन’ काळातही ७३३ पिशव्या रक्तसंकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 05:00 IST

‘रक्तदान म्हणजेच जीवदान’ असे म्हटले जाते. रक्तदानातून एखाद्याचा जीव वाचविता येतो. रक्ताची निर्मिती कारखान्यात करता येत नसून त्यासाठी रक्तदानच करावे लागते. मात्र कोरोनामुळे देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले असता अवघ्या देशातच रक्तपेढ्यांना रक्ताची कमतरता भासली होती. कोरोना महामारीमुळे जगभरातील व्यवहार ठप्प पडले.‘लॉकडाऊन’मुळे शाळा-महाविद्यालय बंद पडले व रक्तदान शिबिरांचे आयोजनही बंद पडले.

ठळक मुद्देसामाजिक संस्थांचा पुढाकार : कठीण परिस्थितीतही सरसावले रक्तदाते, युवकांनी दिली साथ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ‘लॉकडाऊन’चा फटका अवघ्या देशातील सर्वच व्यवहारांवर जाणवत असतानाच रक्त पेढ्यांमधील रक्तसाठाही संपत असल्याचे चित्र बघावयास मिळाले होते. मात्र येथील काही सामाजिक संस्थांनी अडचणीची स्थिती जाणून घेत रक्तदान शिबिर घेतले. त्यात ७३३ युवकांनी रक्तदान केल्याने येथील शासकीय रक्तपेढीची समस्या सुटली.‘रक्तदान म्हणजेच जीवदान’ असे म्हटले जाते. रक्तदानातून एखाद्याचा जीव वाचविता येतो. रक्ताची निर्मिती कारखान्यात करता येत नसून त्यासाठी रक्तदानच करावे लागते. मात्र कोरोनामुळे देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले असता अवघ्या देशातच रक्तपेढ्यांना रक्ताची कमतरता भासली होती. कोरोना महामारीमुळे जगभरातील व्यवहार ठप्प पडले.‘लॉकडाऊन’मुळे शाळा-महाविद्यालय बंद पडले व रक्तदान शिबिरांचे आयोजनही बंद पडले. विशेष म्हणजे, शस्त्रक्रि येसाठी रक्ताची गरज भासत असून रक्तविकाराने ग्रस्तांनाही रक्ताचा नियमित पुरवठा करावा लागतो. मात्र येथील शासकीय रक्तपेढीतही रक्ताची कमतरता भासत होती. त्यामुळे कोरोनाचा रक्तादानाशी काहीच संबंध नसून रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले होते.अशात शहरातील काही सामाजिक संस्थांनी या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत ११ रक्तदान शिबिरांचे आयोजन केले. यामध्ये ७३३ युवकांनी रक्तदान करून रक्तपेढीला सहकार्य केले.सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या या ११ शिबिरांमुळे रक्तपेढीला ७३३ पिशव्या रक्त संकलन करता आले व यामुळे ‘लॉकडाऊन’च्या काळातही रक्तपेढीची ही समस्या सुटली. या शिबिरांसाठी डॉ.यादव, डॉ.चव्हाण, डॉ.तनवीर खान, डॉ.पल्लवी गेडाम, प्रशांत बोरकर, सृष्टी मुरकुटे, विनोद बंसोड, सतीश पाटील, यशवंत हनवते, आनंद पडोरे, नंदा गौतम, खगेंद्र शिवरकर, राजू रहांगडाले, हेमंत बिसेन व एम.जी. पॅरामेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.सामाजिक संस्थांनी आणखीही रक्तदान शिबिरांचे आयोजन करून रक्ताचा पुरवठा करवून दिल्यास जिल्ह्यात रक्ताची कमतरता पडणार नाही असे रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी अनिल गोंडाणे यांनी सांगीतले.या संस्थांनी घेतला रक्तदानासाठी पुढाकाररक्तदानासाठी संत निरंकारी मंडळ, सोच सेवा संस्थान, सृजन सामाजिक संस्था, जुनी पेन्शन योजना, ब्राम्हण समाज, करनी सेना, गुरूद्वारा कमिटी, खालसा सेवा दल, जनविकास फाऊंडेशन, संविधान मैत्री संघ, युवा सेना या संस्थांनी पुढाकार घेतला. या संस्थांनी ११ रक्तदान शिबिरांचे आयोजन करून ७३३ पिशव्या रक्त रक्तपेढीला उपलब्ध करवून दिल्याने‘लॉकडाऊन’च्या कठीण काळातही कुणाही रूग्णाला रक्ताच्या कमतरतेचा फटका सहन करावा लागला नाही.कोरोना व रक्तदानाचा संबंध नाहीकोरोना व रक्तदानाला घेऊन नागरिकांत संभ्रम होते व त्यामुळे रक्तदान करण्यासाठी नागरिक पुढे येत नव्हते. मात्र कोरोना व रक्तदानाचा काहीच संबंध नसल्याचे ‘लोकमत’नेही बातमीच्या माध्यमातून मांडत नागरिकांत जनजागृती केली होती. विशेष म्हणजे, नामवंत डॉक्टरांनाही कोरोना व रक्तदानाचा संबंध नसल्याचे स्पष्ट करीत सहकार्य केले होते.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीcorona virusकोरोना वायरस बातम्या