शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

९० लाख खर्चूनही पूल अर्धवटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:33 IST

सडक-अर्जुनी तालुक्यातील रेंगेपार -डोंगरगावला जोडणाऱ्या पुलावर ९० लाख रूपयांचा निधी खर्च करुनही पुलाचे बांधकाम अर्धवट आहे. यात काहींचे हात ओले झाल्याचे बोलल्या जाते.त्यामुळे या बांधकामाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

ठळक मुद्देविकास कामांना ब्रेक : दोन किमी अंतरात दीडशे खड्डे, संबंधित विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सडक-अर्जुनी तालुक्यातील रेंगेपार -डोंगरगावला जोडणाऱ्या पुलावर ९० लाख रूपयांचा निधी खर्च करुनही पुलाचे बांधकाम अर्धवट आहे. यात काहींचे हात ओले झाल्याचे बोलल्या जाते.त्यामुळे या बांधकामाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जात आहे.सडक अर्जुनी तालुक्यातील मोठे गाव म्हणून ओळख असणारे डोंगरगाव (खजरी) येथील विकास कामांना मागील काही दिवसांपासून खीळ बसल्याचे चित्र आहे. त्यामुळे गावकºयांमध्ये नाराजीचा सूर आहे. याकडे ग्रामपंचायतच्या पदाधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे. डोंगरगाव (खजरी) येथे विविध कामे मंजूर आहेत. मात्र मंजूर कामाच्या पुर्णत्वासाठी अद्यापही पाठपुरावा न झाल्याने या विकास कामांना ब्रेक लागला आहे. परसोडी ते डोंगरगाव दोन किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण ३० लाख रूपयाचे काम, पाणी पुरवठा योजनेचे काम ६० लाख रूपयाचे, ३५ केव्हीचे वीज उपकेंद्र अद्यापही सुरू झाले नाही. विकास कामांना ब्रेक लागल्यामुळे गावकºयांमध्ये रोष आहे. या गावात ग्रामसेवक राहत नाही.सरपंच दिनेश हुकरे अर्जुनीत राहतात. त्यामुळे गावातील विकास कामांवर परिणाम होत आहे. याकडे ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी लक्ष देवून गावातील विकास कामांना गती देण्याची मागणी होत आहे. इंदिरा कोरे यांच्या घरकुल योजनेचा ठराव जिल्हा परिषदेने पंचायत समितीला पाठवायला हवा होता. परंतु त्यांचा ठराव अद्यापही पाठविला नाही. या ठरावाचा पाठपुरावा जि.प.सदस्यांनी करायला हवा होता. परंतु त्यांनीही केला नाही. त्या ठरावा शिवाय पंचायत समिती काम करू शकत नाही, असे उपसभापती राजेश कठाणे यांनी सांगितले. ठराव मिळाला तर आम्ही रोहयोतून तातडीने घरकुल योजनेचे काम करू असे त्यांनी सांगितले. तत्कालीन मुकाअ रविंद्र ठाकरे यांनी आमसभेत घरकुल देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यांची दुसºयाच दिवशी बदली झाल्याने हे घरकुल रखडले आहे. पाणी पुरवठा योजना तातडीने राबवली नाही तर निधी परत जाण्याचा धोका आहे. गावात पाणी टंचाई आहे. गेटवाढ मध्ये नळ योजनाच नाही त्यामुळे ब्राम्हणकर ते बन्सोड यांच्या घरापर्यंत नळच नाहीत. ग्रामपंचायतने या नव्या वस्तीत तातडीने नळ योजनेची पाईप लाईन टाकणे गरजेचे आहे. परसोडी ते डोंगरगाव या दोन किमी अंतरात दीडशे खड्डे पडले आहेत. मात्र हा रस्ता जिल्हा परिषदेचा याच विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग