शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाचे चटके अन् कार्यकर्त्यांचा उत्साह

By admin | Updated: May 17, 2014 00:18 IST

लोकसभा निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच भंडार्‍यात गर्दी केली होती. महिलांची गर्दी उल्लेखनीय होती. निकालाच्या उत्सुकतेमुळे लोकांनी उन्हाची पर्वा केली नाही.

संजय साठवणे - भंडारा

लोकसभा निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच भंडार्‍यात गर्दी केली होती. महिलांची गर्दी उल्लेखनीय होती. निकालाच्या उत्सुकतेमुळे लोकांनी उन्हाची पर्वा केली नाही. शहरातील प्रत्येक रस्त्यावर गर्दीच दिसून आली. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्यामुळे वाहनधारकांना पायी फिरावे लागले. आवागमनाचे अनेक रस्ते बंद करण्यात आले होते. या दरम्यान पानटपरी, हॉटेलमध्येही कमालिची गर्दी दिसून आली.

एक्झीट पोलच्या आकडेवारीनंतर भाजपचे कार्यकर्ते उत्साही होते. परंतु प्रत्यक्षात निकाल कसा लागेल, याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली होती. त्यामुळे भंडारा येथे भाजप कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीत भाजप समोर असल्याचा निकाल येताच कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद चौकात मोठय़ा प्रमाणात आतषबाजी केली. नाना पटोले यांच्या विजय होणार याहेतुने त्यांनी रथ तयार करण्यात आलेला रथ जिल्हा परिषद चौकासमोर ठेवण्यात आला होता. येणार्‍या जाणार्‍यांचे या रथाकडे लक्ष जात होते व कार्यकर्तेही कुतुहलाने पाहत होते.

आ.नाना पटोले यांचे मुळ गाव सुकळी असल्याने साकोली येथे आ.पटोले यांच्यावर लोकांचे विशेष आकर्षण आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालाची आतुरता साकोलीवासीयांना जास्तच होती. साकोलीत सकाळपासून भाजप कार्यकर्त्यात कुतूहल होती. नाना निवडून तर नक्कीच येतील मात्र मते किती घेतील.

प्रसार माध्यमातून व भंडारा येथून वार्ता मिळताच साकोली परिसरात आतिशबाजी सुरू करण्यात आली. या दरम्यान भाजप कार्यकर्त्यात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण दिसून येत होते.

लोकसभेच्या निकालाची प्रतिक्षा विधानसभेच्या इच्छुकांसाठीही होती. लोकसभा निवडणूक पार पडली की विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू होणार, अशी चर्चा होती.