शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रशुद्ध शेती करुन शेतकऱ्यांनी समृद्ध व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 23:39 IST

सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. शेतीमध्ये सुद्धा पीक घेण्यासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. पारंपारिक धान शेतीसोबत ऊस, भाजीपाल्यासारख्या रोख पिकांकडे वळावे.

ठळक मुद्देमनोहर चंद्रिकापुरे : ग्राम गोंगले येथील शेतकरी मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. शेतीमध्ये सुद्धा पीक घेण्यासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. पारंपारिक धान शेतीसोबत ऊस, भाजीपाल्यासारख्या रोख पिकांकडे वळावे. आज जागतिक बाजारपेठेत स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी तंत्रशुद्ध शेतीचा अवलंब करुन आर्थिक समृद्ध व्हावे असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे जिल्हा किसान अध्यक्ष व सेवानिवृत्त कृषी अधिकारी मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.येथील अ‍ॅग्रीकोज वेलफेअर सोसायटीच्यावतीने मंगळवारी (दि.३०) ग्राम गोंगले येथील कालाबाबा मंदिराच्या मैदानात आयोजीत शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य व गटनेते गंगाधर परशुरामकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याचे माजी संशोधक डॉ. शिवाजी सरोदे, कृषी महाविद्यालय अकोल्याचे सेवा निवृत्त प्राचार्य विजय गोलीवार, माजी विभागीय व्यवस्थापक अर्जुन गुगल, माजी कृषी अधिकारी गजानन देवळीकर, अ‍ॅड. सुरेश देशपांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. अविनाश काशीवार, सरपंच इंजिनिअर डी.यू. रहांगडाले, विजय तपाडकर, हरि भांडारकर, आर.व्ही.तलांजे, प्रमोद पांढरे, राकेश कळमकर, रमेश शिवणकर प्रामुख्याने उपस्थित होते. चंद्रीकापुरे म्हणाले आपल्या क्षेत्रामध्ये राष्ट्रीय महामार्ग व लोहमार्ग असल्याने जगाच्या बाजारपेठेत आपल्या पिकाची विक्री व्हावी. आपले स्थान निर्माण होण्यासाठी शेतकºयांनी कंबर कसावी. यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञानाचे मेळावे आयोजन करुन शेतकºयांसाठी आपण समर्पित आहोत. पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर रोख पीक घेण्यासाठी आपल्याकडे समृद्ध वातावरण आहे. हवा योग्य आहे, माती व पाणी सुद्धा योग्य प्रमाणात असून त्यांचे शेतमाल परदेशात निर्यात होतात ती स्थिती आपण सुद्धा निर्माण करु शकतो.फक्त आपण आपली मानसिकता तयार केली पाहिजे. सध्या आपल्या भागात अ‍ॅप्पल बोर, ऊस, भाजीपाला, केळी, डाळींब, कांदा व पपईसारखे पीक धानासोबत घेतले जात आहे. यामध्ये तांत्रिक बाबीचा अवलंब होऊन यातून गुणवत्तेचे रोख पीक निघाल्यास आपला माल शहरात किंवा बाहेर देशात सुद्धा निर्यात होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला.परशुरामकर यांनी, धानावर दिवसेंदिवस विविध रोगांचे आक्रमण होत आहे. त्यामुळे आता आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी रोख पिकांकडे वळणे अगत्याचे झाले असल्याचे सांगीतले. डॉ. सरोदे यांनी किड व रोगासंबंधी, गोलीवार यांनी भाजीपाला व फळपिके उत्पादन, गुगल यांनी शेतपिकांसाठी कर्ज, देवळीकर यांनी शेतकऱ्यांसाठी विविध योजना, अ‍ॅड. देशपांडे यांनी शेतकऱ्यांना कायदेविषयक माहिती दिली. संचालन सेवानिवृत्त कृषी अधिकारी एफ.आर.टी. शहा यांनी केले तर आभार सरपंच रहांगडाले यांनी मानले.

टॅग्स :agricultureशेती