शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

यशस्वी माणसांचे विचार आत्मसात करा!

By admin | Updated: January 9, 2017 01:02 IST

नम्रपणा माणसाला मोठा करतो, त्यामुळे अहंपणा बाळगू नये. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगावा.

पालकमंत्री बडोले यांचे आवाहन : जि.प.हायस्कूलमधील कार्यक्रम सडक-अर्जुनी : नम्रपणा माणसाला मोठा करतो, त्यामुळे अहंपणा बाळगू नये. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगावा. तसेच यशस्वी माणसांचे विचार आत्मसात करून विद्यार्थ्यांनी आपले जीवन घडवावे असे प्रतिपादन राज्याचे सामाजीक न्याय मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने आयोजीत स्नेह संमेलनाच्या समरोप समारंभ व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगर पंचायत सभापती ज्योती गिऱ्हेपूंजे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष रिता लांजेवार, तहसीलदार विठ्ठल परळीकर, गटविकास अधिकारी आनंद लोकरे, नगर पंचायत उपाध्यक्ष महेंद्र मसराम, सदस्य देवचंद तरोणे, गटशिक्षणाधिकारी आर.एल.मांढरे, वैशाली गिऱ्हेपूंजे, लेखराम मुनेश्वर, शाहीद पटेल, युनूस शेख, प्रा.राजकुमार भगत, जीजा पटोले, सरपंच अनिता बडोले, आर.व्ही.मेश्राम, अंकीत भेंडारकर, प्राचार्य अयाज खान, अंजूम खान उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित अन्य पाहुण्यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्तावीक प्राचार्य खान यांनी मांडले. संचालन शिक्षक अनिल मेश्राम यांनी केले. आभार डी.पी. डोंगरवार यांनी मानले. स्नेह संमेलनासाठी आर.एस.डोये, एम.एन. भौतीक, यु.आर. तांदळे, एस.सी. फुंडे, ए.आर. कुथीरकर, वाय.के .टेंभूर्णे, डब्ल्यू.एम. परशूरामकर, वाय.वाय. कोहळे, पूजा पाटील, पी.सी. येळेकर, सी.एम. भीवगडे, एन.आर. गिरेपूंजे, यु.आय. पाखमोडे, आय.वाय. रहांगडाले, एन.जे. सावळकर, व्ही.एस. बागळकर, ए.व्ही. केंद्रे, एस.एस. ठलाल, जी.आर.निंबेकर, एस.जी. मारबते यांच्यासह शाळा मंत्रीमंडळ, शाळा समिती, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघाच्या पदाधिकारी सदस्यांनी तसग्ेच नागरिकांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी) गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ४कार्यक्रमात एसएससी परिक्षेतील प्रथम इंद्रशेखर दूधराम डोंगरवार, द्वितीय प्रज्वल तिर्थानंद पंचभाई तसेच एचएससी परिक्षेतील प्रथम सागर मधूकर गावतुरे व किशोर निताराम मोहुर्ले यांचा नामदार बडोले यांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देऊन पुरस्कार करण्यात आला. तर सोबतच गटविकास अधिकाऱ्यांनी गुणवंतांना रोख एक हजार रूपये व अंध विद्यार्थी किशेर मोहुर्लेयाचा दोन हजार रूपये रोख देऊन सत्कार केला. शिवाय एकलव्य ज्ञानवर्धीनी सामान्य ज्ञान स्पर्धेतील प्रथम प्रतीक पंचभाई, द्वितीय श्वेता किशोर उके, तृतीय प्रगती यशवंत भेंडारकर, रोहीणी बळीराम मेश्राम व अर्शिल आरिफ खान यांचाही सत्कार करण्यात आला.