शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षाविषयक जनजागृतीवर भर

By admin | Updated: January 14, 2016 02:24 IST

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व पोलीस विभागाच्या वतीने १० ते २४ जानेवारीपर्यंत राबविण्यात येत असलेल्या रस्ता सुरक्षा अभियानात जनजागृतीपर उपक्रमांवर भर दिला जात आहे.

रस्ता सुरक्षा अभियान : विविध उपक्रमांचे आयोजन गोंदिया : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व पोलीस विभागाच्या वतीने १० ते २४ जानेवारीपर्यंत राबविण्यात येत असलेल्या रस्ता सुरक्षा अभियानात जनजागृतीपर उपक्रमांवर भर दिला जात आहे. वाहन चालक, युवक-युवती व सामान्य नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. दि. ११ रोजी सीमा तपासणी नाका शिरपूर देवरी तसेच शहरातील मुख्य मार्गावर ट्रॅक्टर ट्रेलर व इतर ११२ वाहनांंना रिफ्लेक्टीव्ह टेप लावण्यात आले. वाहनाच्या मागील भागात रिफ्लेक्टरमुळे अपघात टाळता येऊ शकतात. याबाबत उपस्थित वाहनचालक व मालक यांना मार्गदर्शन करण्यात आले. दि. १२ रोजी वाहन चालकांकरीता नेत्र तपासणी शिबिर, आरोग्य तपासणी शिबीर तसेच रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. नेत्रतज्ञ डॉ. राजेंद्र अग्रवाल यांनी वाहन चालकांची नेत्र तपासणी करून मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.रवि धकाते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एन.आर.निमजे, नेत्र चिकीत्सक अधिकारी डॉ.पवन काळे, सहायक संजय पारधी, आरोग्य तपासणीसाठी डॉ. योगेश हिरापुरे, डॉ. प्रगती खंडाते, औषधी निर्माता जनार्धन जामवंत, नुतन कठाणे व अधिपरिचारिका उपस्थित होते. रक्तदान शिबिराकरीता जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या डॉ.गायत्री घाबेकर, डॉ.अनिल गोंडाणे, विणा पारधी, राजु रहांगडाले व हेमंत बिसेन उपस्थित होते. यावेळी वाहतूक निरीक्षक के.एम.धुमाळ, मोटार वाहन निरीक्षक विशाल भोवते, अशफाक अहमद, परिवहन विभागाचे अनिरूध्द देवधर, संदीप पवार, प्रभाकर पेन्सीलवार, दिनेश पाटील, पोलीस कार्यालयाचे राजेंद्रसिंह टिकारिया, श्रीधर शहारे, चौधरी, गायकवाड, वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सदगीर, पोलीस नाईक, अजय बन्सोड, गागेश्वर उके, पोलीस शिपाई रहांगडाले व ईश्वर उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)