शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

लघुसिंचन कार्यालयात अभियंत्याची वाणवा

By admin | Updated: October 24, 2016 00:54 IST

उपविभागीय अभियंता लघू सिंचन उपविभाग अर्जुनी मोरगाव कार्यालयात सध्या तांत्रिक कर्मचाऱ्यांची वाणवा आहे.

बोंडगावदेवी : उपविभागीय अभियंता लघू सिंचन उपविभाग अर्जुनी मोरगाव कार्यालयात सध्या तांत्रिक कर्मचाऱ्यांची वाणवा आहे. कार्यरत असलेले उपविभागीय अभियंता कार्यालय सांभाळण्याव्यतिरिक्त इतर विकासात्मक कामाला गती देत नाही, अशी व्यथा निर्माण झालेली दिसत आहे. तालुक्यातील बरेच तलाव दुरुस्तीसाठी आहेत. तलाव कामाचे ईस्टीमेट बनविणारे अभियंता वर्ग कार्यालयाला दुर्मिळ झाल्याने तलाव दुरुस्तीच्या कामाला ब्रेक लागल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे.तालुक्याचे ठिकाण असलेल्या अर्जुनी मोरगाव येथे उपविभागीय अभियंता लघू सिंचन जिल्हा परिषद उपविभागाचे कार्यालय आहे. पूर्वी या कार्यालयात शाखा अभियंता होते. तेव्हा नियमित कार्यभार सांभाळणारे उपविभागीय अभियंता नव्हते. कित्येक महिने प्रभारी अधिकाऱ्यावर कार्यालयाची धुरा होती. त्यामुळे विकास कामांना खिळ बसत होती. आजघडीला सदर कार्यालयात उपविभागीय अभियंता नियमित कार्यरत आहेत. कनिष्ठ शाखा अभियंताचे ५ जागा मंजूर आहेत. सध्या २ शाखा अभियंता असले तरी, त्यामधील १ शाखा अभियंता कार्यालयाला भारी डोईजड असल्याचे बोलल्या जाते. येथूृन बदलून गेलेल्या अभियंत्याच्या ठिकाणी दुसरे आले नसल्याने कार्यालय बिनाकामाचे ठरत असल्याचे चित्र दिसते. आज तालुक्यातील माजी मालजुगार तलाव, बोड्यांच्या दुरुस्तीचे काम मोठ्या प्रमाणावर आहे. बोंडगावदेवी येथील ‘चिचबोडी तलाव’ मागील काही वर्षापासून पाळ फुटली असताना ईस्टीमेट अभावी ती त्याच अवस्थेत आहे. तांत्रिक कर्मचाऱ्यांची उणीव कार्यालयात असल्याने बऱ्याच विकास कामांना खीळ बसत आहे. शेवटच्या टोकावर असलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यावर वक्रदृष्टी ठेवून कर्मचाऱ्यांचा बॅकलॉग निर्माण करीत आहे. (वार्ताहर)