शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

अतिक्रमणधारकांनो ‘सावधान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:17 IST

अतिक्रमण हटविण्यासाठी टप्प्याटप्प्याने तयारी केली जात असल्याचे आता शहरात दिसून येत आहे. यात मोजणी व मार्किंगचे काम सुरू झाले असतानाच बाजारातील मुख्य मार्गांवर मुनादी सुरू झाली आहे.

ठळक मुद्देशहरात सुरू झाली मुनादी : अतिक्रमण मोहिमेच्या तयारीला वेग

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अतिक्रमण हटविण्यासाठी टप्प्याटप्प्याने तयारी केली जात असल्याचे आता शहरात दिसून येत आहे. यात मोजणी व मार्किंगचे काम सुरू झाले असतानाच बाजारातील मुख्य मार्गांवर मुनादी सुरू झाली आहे. मोहिमेंतर्गत प्राधान्य देण्यात आलेल्या मुख्य मार्गांवर यासाठी एक रिक्शा फिरत आहे. यातून अतिक्रमणधारकांना सुचीत केले जात आहे.आजघडीला अतिक्रमण हा विषय राज्यातच गाजत आहे. अवघ्या राज्यातच अतिक्रमण ही एक गंभीर समस्या निर्माण झाली असून अतिक्रमणामुळे कित्येक सहर विदु्रप झाले आहे. परिणामी तेथील नागरिकांना याचा फटका दैनंदिन जिवनात सहन करावा लागत आहे. यासाठी राज्य शासनाकडूनच अतिक्रमण हटविण्यासाठी पाठिंबा दिला जात आहे. अतिक्रमणाचा हा आजार गोंदिया शहरालाही जडला असून त्याचा त्रास शहरवासी भोगत आहेत. शिवाय शहराचे विद्रुपीकरण झाले असतानाच विकासाच्या कित्येक योजना राबविताना आता त्रास जाणवत आहे.अतिक्रमणाचा विषय आता नेहमीप्रमाणे पुढे-पुढे ढकलण्यापेक्षा येथेच संपविण्यात यावा यासाठी जिल्हा व नगर परिषद प्रशासनाकडून पुरेपुर प्रयत्न व तयारी केली जात आहे. यांतर्गत शहरवासीयांच्या सुविधेसाठी शहरातील मुख्य मार्गांना प्राधान्य देत अतिक्रमण हटाओ मोहिमेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. शिवाय कुडवा नाकापासून अतिक्रमणाची मोजणी सुरू करण्यात आली आहे. अतिक्रमणाची ही मोहिम यंदा फत्ते करण्यासाठी संबंधीत सर्वच शासकीय विभाग कामाला लागले असून निवड करण्यात आलेल्या मार्गांवरील अतिक्रमणाची मोजणी करीत आहेत.एवढेच नव्हे तर, भूमी अभिलेख विभागाकडून अतिक्रमण काढण्यासाठी निवड करण्यात आलेल्या मार्गांवरील जागेची मोजणी व मार्कींग करण्यासाठी तारखांचे नियोजनही करण्यात आले आहे. मोजणी व मार्कींगचे हे काम पूर्ण होताच मोहिम राबविली जाणार असल्याचे नियोजन नगर परिषदेने केले आहे. मात्र त्यापूर्वी या मार्गावरील अतिक्रमणधारकांच्या सुचनार्थ नगर परिषदेने आता मुनादी सुरू केली आहे. यांतर्गत एक रिक्शा बाजार भागातील निवड करण्यात आलेल्या मार्गांवर फिरत आहे.या मुनादीतून अतिक्रमणधारकांना त्यांनी केलेले अतिक्रमण स्वत:च काढण्याचे आवाहन केले जात आहे. असे न झाल्यास मोहिम राबविण्यास सुरूवात झाली असता नगर परिषद अतिक्रमण काढणार असल्याचेही सुचीत केले जात आहे. या मुनादीमुळे मात्र अतिक्रमणधारकांत धडकी भरली असल्याचेही बोलले जात आहे.मार्किंग झाल्यावर देणार नोटीसशहरातील कुडवा नाका परिसरातून अतिक्रमण मोजणीच्या कामाला सुरूवात झाली आहे. अतिक्रमण मोजणी सोबतच मार्किंग ही केली जाणार आहे. यात निवड करण्यात आलेल्या मार्गांवरील मोजणी व मार्किंग केल्यावर अतिक्रमणधारकांना नोटीस दिले जाणार आहे. नोटीस दिल्यावर अतिक्रमणधारकांना काही मुदत दिल्यानंतर मात्र अतिक्रमण काढले जाणार असल्याचे नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी सांगीतले.