शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण हटाव मोहिमेचा मुहूर्त निघाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 22:44 IST

शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी नगर परिषद आणि जिल्हा प्रशासनातर्फे मागील दोन महिन्यांपासून नियोजन सुरू होते. मात्र प्रत्यक्षात मोहिमेला सुरूवात न झाल्याने त्यावरुन विविध चर्चेला उधाण आले होते.

ठळक मुद्देसावराटोली परिसरातून सुरूवात : अतिक्रमण काढून रस्ता केला मोकळा, पंधरा दिवस चालणार मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी नगर परिषद आणि जिल्हा प्रशासनातर्फे मागील दोन महिन्यांपासून नियोजन सुरू होते. मात्र प्रत्यक्षात मोहिमेला सुरूवात न झाल्याने त्यावरुन विविध चर्चेला उधाण आले होते. अखेर नगर परिषदेने अतिक्रमण हटाव मोहिमेला आज शुक्रवार (दि.२४) पासून सावराटोली परिसरातून सुरूवात केली. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेचा मुहूर्र्त निघाल्याची चर्चा शहरवासीयांमध्ये होती.शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे नगर परिषदेसह शहरवासीयांची चांगलीच डोकेदुखी वाढली होती. शहरातील मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेल्या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाल्याने दर तासाला वाहतुकीच्या कोंडीचे चित्र पाहयला मिळत होते. परिणामी वाहनचालकांना रस्त्यावरुन मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत होती. अपघातांच्या संख्येत सुध्दा वाढ झाली होती. नगर परिषदेकडूृन अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यास विलंब होत असल्याने त्यांची हिम्मत वाढली होती. वाढत्या अतिक्रमणाबाबत शहरवासीयांची ओरड वाढल्यानंतर नगर परिषदेने त्याची गांर्भियाने दखल घेतली. अतिक्रमण हटाव मोहिम सुरू करण्याचे आश्वासन देत त्या दिशेने नियोजन सुरू केले.नगराध्यक्ष अशोक इंगळे व मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी एप्रिल महिन्यात अतिक्रमण हटाव मोहिम राबविली होती. मात्र तेव्हा मारहाणीचा प्रकार घडला. त्यामुळे तेव्हा ही मोहिम अर्ध्यावर थांबविली होती. शहरातील अतिक्रमण काढावेच लागणार अशी भूमिका नगराध्यक्ष इंगळे यांनी घेतली. त्यांच्या भूमिकेला जिल्हा प्रशासनाने सुध्दा समर्थन केले. त्यानंतर नगर परिषद आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्तपणे अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील आठवड्यापासून भूमिअभिलेख विभागाकडून शहरातील अतिक्रमणीत ठिकाणाना मार्कींग करण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यानंतर नगर परिषदेने आज शुक्रवारपासून शहरातील सावराटोली मार्गावरील रस्त्याच्याकडेला असलेले अतिक्रमण हटविण्यास सुरूवात केली. रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण पाडून रस्ता मोकळा करण्यात आला. मुख्याधिकारी चंदन पाटील, प्रशासकीय अधिकारी सी.ए.राण व नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.