शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर शहरवासीयांचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:28 IST

नवेगावबांध : ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर गर्दी कमी राहात असल्याने शहरातील अनेक जण या केंद्रांवर लसीकरणासाठी गर्दी करीत आहेत. ...

नवेगावबांध : ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर गर्दी कमी राहात असल्याने शहरातील अनेक जण या केंद्रांवर लसीकरणासाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर शहरवासीयांचे अतिक्रमण होत असल्याचे चित्र आहे.

ज्यांच्याकडे ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी अँड्रॉइड मोबाईल आहेत ते नोंदणी करतात. पण, तालुक्‍यात बहुसंख्य असेही युवक व नागरिक आहेत, की जे अल्पशिक्षित आहेत. त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्यामुळे ते लसीकरणासाठी नोंदणी करू शकत नाहीत. ही लसीकरणात एक अडचण येत आहे. त्यामुळे तालुक्यातील १८ ते ४४ वर्षे वयोगटातील युवक व नागरिकांसाठी ५० टक्के ऑफलाईन लसीकरणाची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे. ग्रामीण आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थीसुद्धा अँड्रॉइड मोबाइलअभावी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिले होते. तालुक्यातील आजही बहुसंख्य लोकांजवळ अँड्रॉइड मोबाईलची सुविधा नाही. कुठे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. अशा परिस्थितीत तालुक्यातील ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागातील १८ वर्षे वयावरील युवक व नागरिक अँड्रॉइड मोबाईलअभावी लसीकरणासाठी नोंदणी कशी करणार?

दुसऱ्या तालुक्यातील व्यक्ती दूरवरून येऊन लसीकरण सुविधेचा लाभ घेत आहेत. स्थानिकांना तालुक्यातच लस सुविधा मिळण्यासाठी तालुकास्तरावरील प्रत्येक केंद्रावर उपलब्ध लस साठ्यापैकी ५० टक्के ऑनलाईन व ५० टक्के ऑफलाईन अशी लस नोंदणी व्हावी, जेणेकरून स्थानिकांची आपल्याच तालुक्यात लस नोंदणी करताना अडचण येणार नाही. युवक, नागरिकांमध्ये गोंधळ कमी होऊन, लसीकरण सुविधा सुरळीत चालेल.

......

माझ्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही. मी लसीकरणासाठी कशी नोंदणी करणार? कुणाला करून मागणार? त्यामुळे सरकारने आमच्यासाठी काहीतरी सोय करून दिली पाहिजे.

- संतोष सयाम, बोरटोला.

...........

लस घेतली पाहिजे असे वाटते. पण, ऑनलाईन नोंदणी करावी लागते. त्याकरिता अँड्रॉइड मोबाईल लागतो, तो माझ्याकडे नाही. ऑनलाईन नोंदणी केल्याशिवाय लस मिळणार नाही. मग मी काय करावे?

ऑनलाईन नोंदणी न करता लस मिळाल्यास ती मी नक्की घेईन.

-नितीन राऊत, नवेगावबांध.

...........

आपल्या ग्रामीण भागात बऱ्याच नागरिकांकडे अँड्रॉइड मोबाईलची सुविधा नाही. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील युवक व नागरिक कोरोना प्रतिबंधक लसीकरिता ऑनलाईन नोंदणी करू शकत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने लसीकरण केंद्रांवर ५० टक्के ऑफलाईन नोंदणी करावी, शिवाय ऑनलाईन नोंदणीसाठी गावात पर्यायी व्यवस्था करावी. - रामदास बोरकर,