शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नदीकाठालगतच्या जागेवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 22:02 IST

आमगाव खुर्द (सालेकसा) गावाबाहेर रस्त्यालगत नदीकाठालगतच्या परिसरात मागील काही दिवसांपासून अतिक्रमण करुन बांधकाम करण्याचा सपाटा सुरू आहे. पुराचा धोका असलेल्या भागातच झोपड्या व पक्के बांधकाम सुरू आहे. त्यामुळे या बांधकामाला पुराचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र यासर्व प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

ठळक मुद्देपूरग्रस्त भागात बांधल्या झोपड्या : काहींनी केले पक्के बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : आमगाव खुर्द (सालेकसा) गावाबाहेर रस्त्यालगत नदीकाठालगतच्या परिसरात मागील काही दिवसांपासून अतिक्रमण करुन बांधकाम करण्याचा सपाटा सुरू आहे. पुराचा धोका असलेल्या भागातच झोपड्या व पक्के बांधकाम सुरू आहे. त्यामुळे या बांधकामाला पुराचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र यासर्व प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.आमगाव खुर्द येथे गावात मांस विक्रेत्यांची दुकाने वेगवेगळ्या ठिकाणी सुरू होती. यामुळे गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. या त्रासापासून मुक्ती मिळावी, यासाठी मांस विक्रेत्यांना गावाबाहेर स्थायी स्वरुपात जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी आमगाव मार्गावरील जागा निश्चित करण्यात आली. यानंतर काही मांस विक्रेत्यांनी आपल्या सोयीनुसार जागा पकडून त्यावर कच्चे व पक्के बांधकाम करुन दुकाने थाटली. दरम्यान याच गोष्टीचा फायदा घेत काहींनी नदीकाठालगत असलेल्या जागेवर अतिक्रमण करण्याचा सपाटा सुरू केला आहे. मात्र दरवर्षी पावसाळ्यात या नदीला पूर येत असून पुलावरुन सुध्दा चार ते पाच फूट पाणी असते. त्यामुळे याचा या अतिक्रमण केलेल्या झोपडपट्टयांना व दुकानाना फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदीकाठालगतच्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण करुन कच्चे व पक्के बांधकाम केले जात असताना या प्रकाराकडे मात्र महसूल विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांची हिम्मत वाढत चालली आहे. पावसाळ्यात पूर येऊन त्याचा फटका या अतिक्रमणधारकांना बसल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केले अतिक्रमणआमगाव मार्गावरील शासकीय जागेवर अतिक्रमण करुन कच्चे व पक्के बांधकाम केले जात आहे. बांधकाम करणाऱ्यांमध्ये काही सेवानिवृत्त कर्मचाºयांचा सुध्दा समावेश आहे. त्यामुळे या सर्वांना कोणत्या आधारावर पक्के बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली. असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.प्रशासन दखल घेणार का?शासकीय जागेवर कच्चे व पक्के बांधकाम करण्याचा सपाटा मागील काही महिन्यापासून सुरू आहे. त्यामुळे वेळीच याची दखल घेवून कार्यवाही न केल्यास भविष्यात ही समस्या बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासन या सर्व प्रकाराची दखल घेणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.