शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

अतिक्रमण हटाव मोहीम फिस्कटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 21:36 IST

शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे शहरवासीय चांगलेच त्रासले असून त्यांच्या धिराचा बांध तुटत असल्याने ते आता नगर परिषदेकडे तक्रारी करीत आहेत. प्राप्त झालेल्या अशा तक्रारींची दखल घेत नगररचना विभागाचे सभापती सचिन शेंडे यांनी शुक्रवारी (दि.२१) अतिक्रमण हटविण्यासाठी मोहीम राबविण्याचे नियोजन केले होते.

ठळक मुद्देपोलीस बंदोबस्त मिळालाच नाही : सभापतींची १ जुलैसाठी तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे शहरवासीय चांगलेच त्रासले असून त्यांच्या धिराचा बांध तुटत असल्याने ते आता नगर परिषदेकडे तक्रारी करीत आहेत. प्राप्त झालेल्या अशा तक्रारींची दखल घेत नगररचना विभागाचे सभापती सचिन शेंडे यांनी शुक्रवारी (दि.२१) अतिक्रमण हटविण्यासाठी मोहीम राबविण्याचे नियोजन केले होते. मात्र पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने ही मोहीम फिस्कटली.शहरात अतिक्रमणाने आपले पाय पसरले आहे. परिणामी शहरवासीयांना शहरात वावरने कठीण होत आहे. मध्यंतरी नगर परिषदेने अतिक्रमण काढण्यासाठी चांगली तयारी केली. मात्र ऐनवेळी त्यांची मोहीम फिस्कटली व तिचा आज पत्ताच नाही. मात्र नगर रचना विभागाचे सभापतीपद स्वीकारताच शेंडे यांनी अतिक्रमणाच्या मुद्यावर कारवाई करण्याचे ठरविले आहे. अशात त्यांच्या शहरातून ७० तक्रारी आल्या आहेत. यातील सुमारे ५० अतिक्रमणकर्त्यांना विभागाने नोटीस बजावून आपले अतिक्रमण काढून घेण्याबाबत बजावून मुदत दिली होती. मात्र त्यांच्याकडून अतिक्रमण काढण्यात आले नसल्याने शुक्रवारी (दि.२१) विशेष मोहीम राबविली जाणार होती. यात, मामा चौकातील मुन्ना ठाकूर, देशबंधू वॉर्डात इसरका यांच्या घराजवळ, गौशाल वॉर्ड सावराटोली परिसरात रमेश लारोकर, टॉम जिमजवळ बॉम्बे सोफावाला, बी.एम.पटेल वॉर्ड क्रमांक १० मध्ये एकता अशोक तोलानी, अजय तुरकर, प्रदीप रॉय, लालचंद तुरकर, नर्मदा तुरकर यांच्या अतिक्रमाणाचा समावेश आहे. मात्र ऐनवेळी पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने ही मोहीम पुढे ढकलण्यात आली आहे. अशात आता १ जुलै रोजी सदर अतिक्रमण काढण्यासाठी तयारी सुरू आहे.अतिक्रमण निर्मूलन पथकाचे गठनशहरात अतिक्रमण एक गंभीर समस्या बनले असून नगर परिषदेकडून त्यावर काहीच कारवाई करता येत नसल्याचे दिसत आहे. परिणामी अतिक्रमण करण्याचे प्रकार वाढतच चालले आहेत. यात मात्र शहराचे रूप विस्कटत असून सामान्य नागरिकांची डोकेदुखी वाढत आहे. अशात हे अतिक्रमण काढण्यासाठी अधिकाऱ्यांचे आदेश व त्यानंतर एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचे प्रकार घडतात. यावर तोडगा म्हणून नगर परिषद हद्दीतील अतिक्रमण काढण्यासाठी अतिक्रमण निर्मुलन पथक तयार करण्याचा प्रस्ताव नगररचना विभागाने मांडला आहे. विशेष म्हणजे, या पथकाला त्वरीत कारवाई करण्याचे संपूर्ण अधिकार प्रदान करण्यात यावे अशी मागणी असून गुरूवारी (दि.२७) होणाºया सर्व साधारण सभेत हा विषय मांडला जाणार आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण