शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यांवर अतिक्रमण सफाईत अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:31 IST

वॉक करणाऱ्यांची संख्या वाढली आमगाव : गुलाबी थंडीमुळे अगदी सकाळी फिरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. फिरणाऱ्यांच्या गर्दीने ...

वॉक करणाऱ्यांची संख्या वाढली

आमगाव : गुलाबी थंडीमुळे अगदी सकाळी फिरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. फिरणाऱ्यांच्या गर्दीने शहरातील सर्वच प्रमुख रस्ते गजबजून गेलेले दिसत आहेत. कोरोना काळात ऑक्सिजन लेवल वाढविण्यासाठी सकाळी फिरण्याचा उपयोग होत असल्याचे अनेकांनी सांगितले. त्यानुसार, सध्या नागरिकांचा कल सकाळी फिरण्याकडे वाढला आहे.

शाळा बंद असल्याने विद्यार्थी सैराट

सालेकसा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने मार्च, २०२० पासून शाळा-महाविद्यालये बंद केली आहेत. जीवनावश्यक वस्तूंसाठी दुकाने अनलॉक करण्यात आली असून जून, २०२० या वर्षीचे शैक्षणिक वर्ष सुरू होणार होते. परंतु दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा वाढता आलेख लक्षात घेता, शैक्षणिक संस्था बंदच आहेत. त्यावर पर्याय म्हणून शासनाने ऑनलाइन शिक्षणप्रणाली देण्याचे धोरण निश्चित करून फोनमार्फत ऑनलाइन शिक्षण सुरू केले, परंतु सर्वच विद्यार्थ्यांकडे फोन उपलब्ध नाहीत. ज्या विद्यार्थ्यांकडे ॲण्ड्रॉइड फोन उपलब्ध आहेत, ते विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाचा उपयोग घेताना दिसून येतात. परंतु ज्यांच्याकडे ॲण्ड्रॉइड मोबाइल नाही ते विद्यार्थी सैराट झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

निराधार लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेतले

गोंदिया : कोरोनामुळे घराबाहेर पडू शकत नसलेल्या वृद्ध व दिव्यांगांना विशेष साहाय्य योजनेचा लाभ मिळवून देता यावा, यासाठी ‘गृहभेट आपुलकीची’ ही संकल्पना अंमलात आणली जात आहे. याअंतर्गत तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार व श्रावण बा‌ळ योजना विभागातील कर्मचाऱ्यांनी नगर परिषद क्षेत्रातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांचे अर्ज भरून घेतले.

प्रदूषण रोखण्यास मंडळाचे दुर्लक्ष

आमगाव : वाहनांना कर्णकर्कश प्रेशर हॉर्न लावण्यासाठी आणि भर रस्त्यावर वाजविण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. प्रेशर हॉर्न वापरणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध कारवाई होत नाही. ध्वनिप्रदूषणात वाढ झाल्याने नागरिक त्रासले आहेत.

सुरक्षा कवचाविना डीपी धोकादायक

तिरोडा : तालुक्यातील अनेक ठिकाणी वीज कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. या उघड्या डीपींमधून वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे त्यापासून केव्हाही मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नाल्यांअभावी पाणी वाहते रस्त्यांवरून

नवेगावबांध : ग्रामीण भागात सिमेंटचे रस्ते करण्यात आले. मात्र, पुरेशा नाल्या खोदल्या नाहीत. ज्या ठिकाणी नाल्या खोदल्या तेथील नाल्याही नागरिकांनी बुजवून टाकल्याने सांडपाणी थेट रस्त्यांवरून वाहते.

ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे

गोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) ग्रामीण भागामध्ये १ लाख किलोमीटर लांबीचे पांदण रस्ते व इतर खडीकरण रस्ते निर्मितीचा संकल्प करण्यात आला आहे.

राइस मिल ठरत आहेत धोकादायक

गोरेगाव : राज्य मार्गावर असलेल्या राइस मिलमुळे वाहन चालकांच्या डोळ्यांत धानाचा कोंडा उडत आहे. त्यामुळे डोळ्यांत कचरा जाऊन वाहन चालकांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कित्येक दिवे बंद

गोंदिया : शहरातील सिव्हिल लाइन्स परिसरातील कित्येक पथदिवे बंद पडून आहेत. यामुळे नागरिकांना रात्री त्रास होतो. मात्र नगर परिषदेचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

जंगलातील वनसंपदा तोडण्याचा सपाटा सुरू

सडक-अर्जुनी : वन संपदेने नटलेल्या जिल्ह्यातील वनांमध्ये वनतस्कर व शिकाऱ्यांची वहिवाट दिसून येते. तस्करांनी वनविभागाचे होत असलेले दुर्लक्ष साधून वनसंपदा तोडण्याचा सपाटा सुरू केल्याचे दिसत आहे.