शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशीही हटविले शहरातील अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 21:55 IST

शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त करुन वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक नियंत्रण विभाग आणि नगर परिषदेने शुक्रवारपासून (दि.१०) संयुक्त अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. ही मोहीम शनिवारी दुसऱ्या दिवशीही राबविण्यात आली.

ठळक मुद्देन.प.व वाहतूक नियंत्रण विभागाची मोहीम । रस्त्यावरील साहित्य जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त करुन वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक नियंत्रण विभाग आणि नगर परिषदेने शुक्रवारपासून (दि.१०) संयुक्त अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. ही मोहीम शनिवारी दुसऱ्या दिवशीही राबविण्यात आली. या मोहीमेदरम्यान रस्त्यावरील अतिक्रमण हटवून साहित्य जप्त करुन ते शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले.शनिवारी सकाळी १० वाजतापासून शहर आणि रामनगर पोलिसांनी दोन वेगवेगळे पथक तयार करून अतिक्रमण हटाव मोहीमेला सुरूवात केली. शहर पोलीस स्टेशन अंतर्गत चांदणी चौक, गांधी प्रतिमा, गोरेलाल चौक, इंदिरा गांधी क्रीडा संकुल परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले. तर रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत रेल्वे स्टेशन समोरील, रेलटोली, शक्ती चौक व पाल चौकातील अतिक्रमण हटवून वाहतुकीसाठी रस्ते मोकळे करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता शाहू यांच्या मार्गदर्शनात वाहतूक नियंत्रण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक संजय सिंह यांच्या नेतृत्त्वात ही अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जात आहे.यासाठी शहर आणि रामनगर पोलीस स्टेशनच्या दहा दहा पोलीस कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली आहे. तसेच नगर परिषद बांधकाम, अग्निशमन आणि नियोजन विभागाचे कर्मचारी सुध्दा या अभियानात सहभागी झाले आहेत.शुक्रवारी शहर पोलिसांनी भादंवीच्या कलम १२२ अंतर्गत ८ व रामनगर पोलिसांनी १४ व्यापाºयांवर कारवाई केली. तर ३५ ते ४० हजार रुपयांचा माल जप्त केला. तर शनिवारी सुध्दा काही व्यापाºयांवर कारवाई करुन साहित्य जप्त केले. ही अतिक्रमण हटाव मोहीम सोमवारपासून अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित विभागाच्या कर्मचाºयांनी दिली.मोहीम केवळ नाममात्र ठरु नयेजिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी उशीरा का होईना शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी आणि शहराला अतिक्रमण मुक्त करण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. मात्र ही मोहीम काही काळासाठी मर्यादित राहू नये तर त्यात सातत्याने ठेवण्याची मागणी शहरवासीेयांनाकडून केली जात आहे.छोट्यांवर कारवाई तर मोठ्यांना सूटवाहतूक नियंत्रण विभाग आणि नगर परिषदेने शहरात संयुक्तपणे अतिक्रमण हटाव मोहीमेला सुरूवात केली आहे. मात्र या मोहीमेदरम्यान केवळ छोट्या व्यापाºयांना लक्ष केले जात असून मोठ्यांना सूट दिली जात असल्याने मोहीमेत दुजाभाव होत असल्याची ओरड आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी याची दखल घेवून पारदर्शकपणे मोहीम राबविण्याची गरज आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण