शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषद हटविणार अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 21:39 IST

दिवाळीनिमित्त शहरातील बाजारपेठेत वाढणारी गर्दी बघता वाहनांच्या पार्कींगसाठी जागा उपलब्ध व्हावी. यासाठी नगर परिषदेकडून मंगळवारी (दि.३०) अतिक्रमण हटाओ मोहिम राबविली जाणार आहे. यासाठी नगर परिषदेला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्र पाठविले आहे.

ठळक मुद्देआज विशेष मोहीम : वाहनांच्या पार्किंगकरिता जागेची सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिवाळीनिमित्त शहरातील बाजारपेठेत वाढणारी गर्दी बघता वाहनांच्या पार्कींगसाठी जागा उपलब्ध व्हावी. यासाठी नगर परिषदेकडून मंगळवारी (दि.३०) अतिक्रमण हटाओ मोहिम राबविली जाणार आहे. यासाठी नगर परिषदेला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्र पाठविले आहे. गोंदिया शहर जिल्हास्थळ असून शहरासह ग्रामीण भागातील जनता दिवाळीच्या खरेदीसाठी आता बाजारापेठेत खरेदीसाठी येत आहे.परिणामी त्यांच्या वाहनांच्या पार्कींगची सोय होत नसून वाहतूक विस्कळत आहे. यावर तोडगा काढता यावा. यासाठी पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांनी नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील यांना पत्र पाठवून बाजारातील रस्त्यांवर करण्यात आलेले तात्पुरते अतिक्रमण हटविण्यास सांगीतले आहे. हे अतिक्रमण हटविल्यास मोकळ््या होणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या पार्कींगची सोय करता येणार आहे.पोलीस अधीक्षक बैजल यांच्या पत्रानुसार नगर परिषद मंगळवारी (दि.३०) शहरात अतिक्रमण हटाओ मोहिम राबविणार आहे. यात नगर परिषदेकडून मंगळवारी गांधी प्रतिमा ते चांदनी चौक, जुनी बाजार समिती रस्ता, जैन कुशल भवन रस्ता होत मोदी पेट्रोल पंप होत सर्कस मैदान रस्त्यावरील अतिक्रमण काढणार आहे.या रस्त्यांवरील अतिक्रमण काढून तेथे वाहनांच्या पार्कींगची सोय केली जाणार आहे.अतिक्रमधारकांच्या माहितीस्तव मुनादी सुरूनगर परिषदेकडून काढण्यात येणाºया या मार्गांवरील अतिक्रमण धारकांच्या माहितीस्तव नगर परिषदेने मागील दोन-तीन दिवसांपासून मुनादी सुरू केली आहे. नगर परिषदेने ऐनवेळी मोहिम सुरू केल्यास या दुकानदारांची धावपळ होवू नये यासाठी नगर परिषद त्यांना अगोदरच सूचित करीत आहे.पोलीस अधीक्षकांनी दिल्या सूचनापोलीस अधीक्षक बैजल यांनी आपल्या पत्रातून मोठ्या उड्डाणपुलाखालील पानठेले व टपºयांचे तात्पुरते अतिक्रमण हटविणे, सुभाष शाळेच्या मैदानाचे प्रवेशद्वार मोठे करावे तसेच नगर परिषद कार्यालयासमोरील पानठेले व भाजपाल्याची दुकाने हटविण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे अतिक्रमण तात्पुरते हटविल्यास येथे दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्कींगची सोय करता येईल हा या मागील हेतूै आहे.