शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण करणाऱ्यांची आता गय करणार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:28 IST

सडक अर्जुनी : सडक अर्जुनी वन परिक्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून जंगल परिसराला लागून काही लोकांनी अतिक्रमण करण्याचा सपाटा ...

सडक अर्जुनी : सडक अर्जुनी वन परिक्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून जंगल परिसराला लागून काही लोकांनी अतिक्रमण करण्याचा सपाटा सुरू केला होता. यामुळे जंगल क्षेत्र कमी होत चालले होते. याचीच दखल घेत वन विभागाने याविरोधात धडक मोहीम सुरू केली असून, वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांवर वन कायद्यानुसार गुन्हा करून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

दोन दिवसांपूर्वी डुग्गीपार येथील एका शेतकऱ्याने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करून वन विभागाची काही जमीन बळकाविण्याचा प्रयत्न केला. ही बाब वन विभागाच्या निदर्शनास येताच त्यांनी या शेतकऱ्याला पकडून त्याच्यावर वन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पंधरा दिवसांपासून रेंगेपार सहवनक्षेत्रात सात हेक्टर जमिनीचे अतिक्रमण काढून त्या ठिकाणी वन विभागाने रोपवण केले आहे. तालुक्यातील सतीटोला, डव्वा, खजरी, कोसमतोंडी, कोकणा, वडेगाव, सिंदीपार, मनेरी या ठिकाणच्या जवळपास १७ हेक्टर जमिनीवरील अतिक्रमण काढून वन विभागाने त्या ठिकाणी रोपवन केले आहे. वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नसल्याने सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश पाचभाई यांनी सांगितले. वन जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी सहवनक्षेत्र अधिकारी संतोष घुगे, शैलेश पारधी, नरेंद्र वाढई, भास्कर प्रधान, वनरक्षक आनंद बनसोड, मंजूषा पटले, शिवेंद्र पवार, विनोद आडे, संजय चव्हाण, नरेश पथोडे, अश्विनी साखरे, दुर्गा अगडे आदी कर्मचारी कारवाही करीत आहे. यामुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहे.