शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची प्रतिभा ओळखून प्रोत्साहित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 23:09 IST

प्रतिभा ही केवळ शहरी विद्यार्थ्यांमध्येच असते असे नाही तर ग्रामीण भागातही आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांतून अनेक विद्यार्थी घडले. आजही उच्चपदावर असलेले बहुतांशी विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकले.

ठळक मुद्देसांस्कृतिक कार्यक्रम : जि.प. विद्यालयाचे स्नेहसंमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : प्रतिभा ही केवळ शहरी विद्यार्थ्यांमध्येच असते असे नाही तर ग्रामीण भागातही आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांतून अनेक विद्यार्थी घडले. आजही उच्चपदावर असलेले बहुतांशी विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकले. त्यामुळे जि.प.च्या शाळा सर्वोत्तम आहेत. विद्यार्थ्यांच्या पालकांनी केवळ आकर्षणाकडे न जाता पाल्यांना जि.प.च्या शाळांमध्ये शिक्षण द्यावे, असे आवाहन नागपूर विभागाचे अतिरिक्त आयुक्त आर.एच. ठाकरे यांनी केले.जिल्हा परिषद हायस्कुल तथा जि.प. प्राथमिक शाळा क्र. २ अर्जुनी-मोरगावच्या त्रिदिवसीय स्रेहसंमेलनाचे उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर, मार्गदर्शक म्हणून प्रशांत गाडे, नगराध्यक्ष पौर्णिमा शहारे, पं.स.उपसभापती आशा झिलपे, शाळा समितीचे अध्यक्ष व जि.प. सदस्य गिरीश पालीवाल, देवेंद्र रहेले, जि.प. सदस्य मंदा कुंभरे, गटविकास अधिकारी एन.आर. जमईवार, गटशिक्षणाधिकारी टी.बी. भेंडारकर, प्राचार्य डी.के. मस्के, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डी.एस. कापगते, शाळा समिती सदस्य अ‍ॅड. राजेश पालीवाल, शंकर लोधी, विजय पशिने, प्रतिभा नाकाडे, शाळा नायक सुशांत तागडे, नंदीनी मेश्राम उपस्थित होते.ठाकरे म्हणाले, विद्यार्थ्यांना घडविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांची आहे. शैक्षणिक अडचणी आहेत. यातून मार्ग काढत जे कमी असेल ते पूर्ण करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करा. विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यावर शिक्षकांनी लक्ष केंद्रीत केले पाहिजे.विद्यार्थ्यांमध्ये पुढे येवून बोलण्याची क्षमता निर्माण केली पाहिजे. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांची पारख करुन त्यांचा ज्याकडे अधिक कल दिसतो त्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे काम शिक्षकांनी केले पाहिजे असे मत व्यक्त केले. प्रशांत गाडे म्हणाले हे स्पर्धेचे युग आहे. भविष्य घडविण्यासाठी विविध दालने खुली आहेत.विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी अगदी शालेय शिक्षण सुरू असतानाच केली पाहिजे. स्पर्धात्मक परीक्षेची पुस्तके वाचनापेक्षा स्वत:ला प्रश्न पडली पाहिजेत. ज्यांना प्रश्न पडत नाहीत ते यशस्वी होत नाही. विद्यार्थ्यांना प्रत्येक बाब जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली पाहिजे. यातूनच जिज्ञासा व चिकित्सक बुद्धी वाढत असल्याचे म्हणाले.