शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयातील रिक्त पदे भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:04 IST

येथील शासकीय तंत्रनिकेत विद्यालयात प्राचार्यासह प्राध्यापकांची पदे त्वरित भरण्याचे निर्देश आ. गोपालदास अग्रवाल तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव दहीफडे व सहसंचालक गुलाब ठाकरे यांना दिले.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल यांचे निर्देश : बांधकामाकरिता निधी उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील शासकीय तंत्रनिकेत विद्यालयात प्राचार्यासह प्राध्यापकांची पदे त्वरित भरण्याचे निर्देश आ. गोपालदास अग्रवाल तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव दहीफडे व सहसंचालक गुलाब ठाकरे यांना दिले.त्यामुळे रिक्त पदे भरण्याची समस्या मार्गी लागणार आहे.शासकीय शासकीय तंत्रनिकेत विद्यालयात मागील वर्षभरापासून प्राचार्य व प्राध्यापकांची पदे रिक्त होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. रिक्त पदे भरण्याकरिता वांरवार पाठपुरावा करुन सुध्दा तंत्रशिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केले होते. आ.अग्रवाल यांनी याची गांर्भियाने दखल घेत विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी हिवाळी अधिवेशना दरम्यान तंत्रशिक्षण शिक्षण विभागाच्या अधिकाºयांची बैठक घेतली.रिक्त पदे भरण्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. रिक्त पदे त्वरीत भरण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. आ. अग्रवाल यांनी या वेळी सहसचिव दहीफडे यांना तंत्रनिकेत विद्यालयात उर्वरित बांधकामासाठी शासनाने ३ कोटी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाला बांधकाम करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले. २०१८-१९ या शैक्षणिक सत्रात विद्यालयात दोन नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. सहसचिव दहीफडे यांनी विद्यालयातील रिक्त असलेली पदे योग्यतेनुसार लवकरच भरण्याचे आश्वासन दिले.त्यामुळे मागील अनेक दिवसांपासूनची प्रलबिंत समस्या मार्गी लागणार असून दोन नवीन अभ्यासक्रम सुरू असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल