शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन विकासातून रोजगाराला वाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:23 IST

तालुक्यात पर्यटनातून अपार रोजगार संधी सालेकसा तहसील महाराष्टÑ राज्याच्या टोकावर व छत्तीसगड मध्यप्रदेश राज्याच्या सीमेलगत लागलेला निसर्ग सौंदर्य व जंगलव्याप्त तालुका आहे. या तालुक्याला निसर्गांनी जे दिले ते अपार दिले आहे.

ठळक मुद्देविकास करण्याची गरज : तर कायापालट शक्य, प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यात पर्यटनातून अपार रोजगार संधी सालेकसा तहसील महाराष्ट्र राज्याच्या टोकावर व छत्तीसगड मध्यप्रदेश राज्याच्या सीमेलगत लागलेला निसर्ग सौंदर्य व जंगलव्याप्त तालुका आहे. या तालुक्याला निसर्गांनी जे दिले ते अपार दिले आहे. त्याुळे या निसर्गाने वरदान दिलेल्या पर्यटनाच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक लोकांना रोजगाराच्या अपार संधी प्राप्त होऊ शकतात.जंगलव्याप्त व शेती व्यासाय करणाऱ्या लोकांची संख्या या तालुक्यात आहे. तसेच तालुक्यातील युवकांना रोजगाराकरिता उद्योग किंवा लघू उद्योग पण उपलब्ध नाही तसेच शेत मालावर प्रक्रिया करुन वस्तू निर्मिती उद्योग उपलब्ध नाहीत. त्यामुळे तालुक्यातील युवकांना रोजगाराच्या संधी फारच कमी आहेत. सध्या परिस्थितीत निसर्गाने जे या तालुक्याला दिले आहे त्याच्या भरवश्यावर या तालुक्यातील युवकांना अपार रोजगार संधी उपलब्ध होऊ शकतात. व हे तालुक्यातील एका पर्यटन क्षेत्रांनी सिद्ध सुद्धा केले. सालेकसा तालुका मुख्यालयापासून अगदी १२ किमी लांब असलेल्या इंग्रज काळातील हाजराफॉल हे आजघडीला त्या हाजराफॉल नजीक नवाटोला गावताील जवळपास २०० च्यावर युवकांना रोजगार उपलब्ध करुन दिले आहे. नवाटोला वन वनव्यवस्थापन समिती व वनविभाग गोंदिया सालेकसा यांच्या संयुक्त प्रयत्नातून हॉजराफॉल क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आला. ज्यामुळे आज या पर्यटन क्षेत्रात पावसाळ्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळते. तसेच इतर ऋतूमध्ये सुद्धा आज जिल्ह्यातील पर्यटकासोबतच संपूर्ण राज्यातील तसेच सीमावर्ती राज्य छत्तीसगड मध्यप्रदेश या राज्यातील पर्यटकासाठी स्पेश हॉलीडे स्पॉट म्हणून नावारुपास येत आहे. ज्यामुळे या क्षेत्रातील युवकाकरिता व्यवसायाचे माध्यम बनत चालले आहे. या क्षेत्राच्या आतमध्ये तसेच बाहेर सुद्धा युवकांना रोजगार उपलब्ध होत आहे.कचरागडच्या विकासाची गरजसालेकसा तालुक्यात आश्यिा खंडातील गोंडी धर्माचे आराध्यस्थळ ‘काशी’ कचारगड सुद्धा प्रचंड मोठे पर्यटनस्थळ आहे. जिथे माद्य महिन्यात मोठी यात्रा भरते. यात लाखोंच्या संख्येत पर्यटक येतात व याकाळात येतात. येथे मोठी बाजारपेठ निर्माण होते. जिथे शेकडो लोकांना रोजगार उपलब्ध होत असतो. परंतु इतर वेळी सुद्धा या क्षेत्राचा विकास पूर्णपणे झाल्यानंतर पर्यटन वाढण्याची संधी मिळेल ज्यामुळे सुद्धा या क्षेत्राच्या आसपास राहणाºया लोकांना प्रचंड रोजगार संधी उपलब्ध होऊ शकते.तालुक्यावर निसर्गाची कृपानिसर्गाने सालेकसा तालुक्याला अनेक निसर्ग पर्यटन क्षेत्र दिले आहेत. ज्यात अंबागडसारखे अनेक स्थळ आहेत. जे पर्यटनाच्या दृष्टीने उपेक्षित आहेत. ज्याचा विकास झाल्यास पर्यटन व्यवसायात वाढ होऊन रोजगार संधी उपलब्ध होऊ शकतात. पुजारीटोला, मानागड, मानपुही यासारखे पाणी साठवण धरणाचा योग्य विकास झाल्यास या धरणांना पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांमुळे सुद्धा या धरणाच्या आसपास असलेल्या युवकांना प्रचंड रोजगार संधी उपलब्ध आहेत. तसेच त्याच तालुक्यात असलेली धार्मिक मंदिरे ज्यात गडमाता मंदिर, अर्धनारेश्वरालय, त्रिलोकेश्वरधाम, पोगेंझरा आश्रम, डोमाटोला शिवमंदिर अशा अनेक धार्र्मिक स्थळाचा योग्य विकास झाल्यास हे स्थळ सुद्धा तहसीलच्या पर्यटन व्यवसायाला चालना देऊन तालुक्यातील अनेक युवकांना रोजगार संधी उपलब्ध करुन देऊ शकतात.

टॅग्स :tourismपर्यटन