शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक निकालाच्या चर्चेत रमले होते कर्मचारी-अधिकारी

By admin | Updated: May 17, 2014 00:20 IST

अखेर निवडणुकीविषयी जय-पराजयाच्या चर्चांंना विराम मिळाला. तब्बल एक महिन्यापासून अविरत चालणार्‍या चर्चा अचानक बदलल्या आणि पुढे आली एक विशेष चर्चा.

देवानंद शहारे/दिलीप चव्हाण - गोंदिया

अखेर निवडणुकीविषयी जय-पराजयाच्या चर्चांंना विराम मिळाला. तब्बल एक महिन्यापासून अविरत चालणार्‍या चर्चा अचानक बदलल्या आणि पुढे आली एक विशेष चर्चा. नानांनी किल्ला काबिज केला आणि एक अभूतपूर्व विजय म्हणून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार क्षेत्राच्या इतिहासात याची नोंद झाली. या चर्चांंना जि.प. व जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील टपर्‍यांवर उधाण आले होते.

भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राच्या या निवडणुकीकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे हेवीवेट नेते केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची थेट लढत होती ती भाजपचे नाना पटोले यांच्याशी. कोण बाजी मारणार, किती मतांनी निवडणूक जिंकणार याविषयीची चर्चा तब्बल एक महिन्यापासून नागरिकांत सुरू होती. कुणी नानांचे पारडे जड असल्याचे सांगायचे तर कुणी भाईजीच निवडून येतील, या तर्क-वितर्कावर रंगत आणायचे.

शुक्रवारी निवडणूक निकालाच्या दिवसीही या चर्चांंना उधाण आले होते. भाजपचे नाना पटोले यांचे मताधिक्य जसजसे वाढत होते, तसतसी निवडणुकीची चर्चा गल्लोगल्लीत वार्‍यासारखी पसरत होती. नानांचे ५0 हजाराने मताधिक्य वाढल्यावर नानांचे सर्मथक रस्त्यावर उतरले होते. जणूकाही नानाच जिंकले, ही जाणीव त्यांना हेरून घेत होती. आपण केलेल्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाल्याचे आनंद ते व्यक्त करीत होते. भान हरवलेल्या आणि गल्लोगल्ली बेभान सुटलेल्या या तरूणाईला जिकडेतिकडे नानांचेच वेड लागले होते. नाना जिंकल्याच्या जल्लोषात वेडी झालेली ही तरूणाई आणि त्यांची उत्कंठा शिगेला पोहचली होती. एकीकडे आतिषबाजी तर दुसरीकडे तरूणाईचा जल्लोषात सारे गाव न्हावून निघाले होते. घडीचे काटे जसजसे पुढे सरकत होते, तसतसे नानांचे मताधिक्य वाढत होते आणि कार्यकर्ते व सर्मथकांमध्ये एकच जल्लोष उसळत होते.

एकीकडे रस्त्यावर जल्लोष तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यातील विविध कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसून येत होते. बरेच कार्यालय ओस पडली होती. आज निवडणुकीचा निकाल लागणार असल्यामुळे अनेकांनी घरीच टीव्हीसमोर बसून निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष दिले. बर्‍याच कार्यालयात कर्मचार्‍यांचा अभाव जाणवत होता. तर नागरिकांनीही कार्यालयीन कामानिमित्त येण्याचे टाळले. त्यामुळे जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालये आज ओस पडली होती. या कार्यालयातील कर्मचारीमधील सुट्टीमध्ये कार्यालयासमोरील चहा-नास्त्याच्या टपरीवर मोठय़ा उत्कंठेने चर्चा करताना आढळले.

निवडणुकीच्या या रणधुमाळीत कोण जिंकेल, कोण हरणार या उत्कंठेत डुबलेल्या या कर्मचारी व अधिकार्‍यांचे आपण कार्यालयातील पंखे सुरूच सोडून आल्याचे भानही हरपले होते. जिल्हा परिषदेच्या अनेक कार्यालयातील पंखे कुणीही नसतानासुद्धा सुरूच होते. सर्वच निवडणुकीच्या निकालावर तल्लीन झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बसून मोठय़ा स्क्रीनवर निवडणुकीचे निकाल पाहण्यात कर्मचारी व काही अधिकारी दंग होवून गेले होते.