शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्यांची बेबंदशाही

By admin | Updated: August 18, 2014 23:35 IST

येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या बेबंदशाहीने परिसरातील रुग्णांची फारच गैरसोय होत आहे. त्यामुळे या रुग्णालयाबद्दलच्या तक्रारी वाढत आहेत. प्रशासनाने मुजोर कर्मचाऱ्यांना वेळीच

नवेगावबांध : येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या बेबंदशाहीने परिसरातील रुग्णांची फारच गैरसोय होत आहे. त्यामुळे या रुग्णालयाबद्दलच्या तक्रारी वाढत आहेत. प्रशासनाने मुजोर कर्मचाऱ्यांना वेळीच पायबंद घालावा अन्यथा रुग्णालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.एकेकाळी नवेगाव ग्रामीण रुग्णालयाचे नाव परिसरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या आदराने घेतले जात असे. दवाखाण्याचा दर्जा व रुग्णांना दिली जाणारी सेवा यामध्ये तडजोड केली जात नसे. डॉ. विकास मेश्राम, डॉ. खोब्रागडे, डॉ.जे.आर. शेंडे यांचे नाव अनेक वर्षानंतरही परिसरातील जनता विसरलेली नाही. परंतु मागील काही वर्षापासून या रुग्णालयाच्या किर्तीला उतरती कळा आणण्याचे काम येथील काही डॉक्टर व कर्मचारी करीत असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत. यादरम्यान आ. राजकुमार बडोले यांनी रुग्णालयाला भेट दिली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.प्रभारी वैद्यकीय अधीक्षक व सहायक अधीक्षक यांच्या बेजबाबदारपणामुळे अधिनस्थ कर्मचाऱ्यांची बेबंदशाही अधिकच वाढल्याचे दिसून आले. एका कर्मचाऱ्याने तर उपस्थित नसतानाही आगाऊ सह्या हजेरी रजिस्टरवर करुन ठेवण्याची दबंगगिरी केली.या रुग्णालयात एकूण सात परिचारिकांची पदे मंजूर असून त्यापैकी पाच पदे भरलेली आहेत. त्यापैकी दोन परिचारिका अर्ज न देता किंवा रजा मंजूर न करताच मागील एक महिन्यापासून गैरहजर आहेत. त्यांच्यावर प्रशासनाच्यावतीने कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. या सर्वांच्या कामाचा भार मात्र फक्त तीनच परिचारिका पाहत आहेत. वरिष्ठांशी जवळीक साधणाऱ्यांना सुट दिल्या जाते असा आरोपही करण्यात आला.संपुर्ण दवाखाण्यामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. एवढेच नव्हे तर सफाई कामगार अनुपस्थित असल्याकारणाने महिला वार्डातील शौचालयात पाणी देखील टाकण्यात आले नाही. मागील आठ दिवसांपासून घाणीचे साम्राज्य असल्यामुळे अनेक रुग्ण वार्डात न थांबता बाहेर पटांगणात थांबने पसंत करीत असल्याचे देखील सांगण्यात येते. ब्लड टेक्निशियन पटले हे चार दिवसांपासून हजर नसून कार्यालयात त्यांचा अर्ज उपलब्ध नव्हता. तसेच हजेरी पटावर त्यांच्या नावासमोर कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती. बाळंतपणासाठी आलेल्या महिला रुग्णांना गंभीर प्रसंगी गोंदियाला हलवावे लागते. अशा रुग्णांना डिझेलचे कारण सांगून शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिल्या जात नाही. वास्तविक पाहता गरोदर महिलांना नि:शुल्क रुग्णवाहिका उपलब्ध करुन द्यायला पाहिजे. रुग्णालयातील अनेक कर्मचारी बाहेरगावाहून जाणे-येणे करतात. परंतु खोटे प्रमाणपत्र सादर करुन ते घरभाडे भत्ता व नक्षल भत्ताची उचल करतात. गरिब जनतेला आरोग्य सेवेपासून वंचीत ठेवण्याचे काम वरिष्ठ अधिकारी करीत असल्याचा आरोप उपस्थित रुग्णांनी केला. अशा माजोऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी व जनतेला आरोग्य सेवा पुरविण्यात यावी अथवा तालाठोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा आ.बडोले यांनी दिला. याप्रसंगी खंडविकास अधिकारी कोरडे, जिल्हा परिषद सदस्य मधुकर मरसकोल्हे, पंचायत समिती सदस्य किशोर तरोणे, माजी सरपंच रघुनाथ लांजेवार, विजय डोये, बाबुलाल नेवारे, बावणकर आदी पदाधिकारी देखील होते. याबाबत आरोग्य प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. (वार्ताहर)