शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनाच्या इशारानंतर कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 22:09 IST

येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने रुग्णांची प्रचंड गैरसोय होत होती. त्यामुळे गावकऱ्यांनी रिक्त पदे त्वरीत न भरल्यास १६ जुलैला रुग्णालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी व ३ कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती या रुग्णालयात केली. तसेच रिक्त पदे भरण्याचे आश्वासन दिले त्यामुळे गावकऱ्यांनी तात्पुरते मागे घेतले.

ठळक मुद्देरिक्त पदे भरण्याचे आश्वासन : नवेगावबांध ग्रामीण रुग्णालय

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने रुग्णांची प्रचंड गैरसोय होत होती. त्यामुळे गावकऱ्यांनी रिक्त पदे त्वरीत न भरल्यास १६ जुलैला रुग्णालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी व ३ कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती या रुग्णालयात केली. तसेच रिक्त पदे भरण्याचे आश्वासन दिले त्यामुळे गावकऱ्यांनी तात्पुरते मागे घेतले.येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक, दोन वैद्यकीय अधिकारी, चार अधिपरिचारिका व एक औषध निर्माता या रिक्त जागा त्वरीत भरण्याची मागणी सरपंच अनिरुद्ध शहारे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य सतिश कोसरकर व गावकºयांनी जिल्हा शल्यचिकित्सक, पालकमंत्री व आरोग्य उपसंचालक यांना लेखी निवेदन देऊन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मंगळवारी ग्रामीण रुग्णालयाच्या स्थानिक प्रशासनाने आंदोलकांना चर्चेसाठी रुग्णालयात बोलाविले होते. एक अधिपरिचारिका चंदा क्षीरसागर, औषध निर्माता आभा उजवणे यांची सेवा संलग्न करण्यात आली आहे. येथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्पित पालीवाल यांना वैद्यकीय अधीक्षकांचा प्रभार देण्यात आला.ग्रामीण रुग्णालय देवरीवरुन वैद्यकीय अधिकारी डॉ. हंसराज हेडाऊ व अर्जुनी मोरगाव येथून डॉ. प्रणाली टेकाम यांना प्रतिनियुक्तीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.अर्पित पालीवाल यांनी शिष्टमंडळाला दिली.ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी येथील अधिपरिचारिका सकाळी ८ ते २ वाजेपर्यंत या रुग्णालयात सेवा देणार असल्याचे सांगितले. पर्यायी व्यवस्था केल्यामुळे आंदोलकांनी समाधान व्यक्त केले. परंतु रिक्त पदांची पुर्ततेच्या मागणीवर आंदोलक ठाम होते.रिक्त पदांची पुर्तता न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.शिष्टमंडळात सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य सतिश कोसरकर, नवल चांडक, विलास कापगते, संजीव बडोले, बाबुराव नेवारे, विजय संग्रामे, रेवचंद शहारे यांचा समावेश होता. या वेळी आयुषचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश लोथे, डॉ. रुपेश कापगते, सहायक अधीक्षक रंगारी, ठाणेदार किशोर पर्वते उपस्थित होते.या रुग्णालयात एक अधिपरिचारिका, औषध निर्माता व दोन वैद्यकीय अधिकाºयांना प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहे. अजून दोन्ही वैद्यकीय अधिकारी रुजू व्हायचे आहेत. ही तात्पुरती मलमपट्टी झाली. रिक्त पदे भरण्याचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे आंदोलनावर आम्ही ठाम आहोत. जिल्हा शल्यचिकित्सकांनी रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा करावा.-सतीश कोसरकर,सदस्य रुग्ण कल्याण समिती