शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मराठी शाळा बंद करण्याची नामुष्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 21:58 IST

महाराष्ट्रात सर्वच शाळांना ‘मराठी’ भाषा शिकविणे अनिवार्य करण्यात असा अशी भूमिका खुद्द मुख्यमंत्र्यांची सुध्दा आहे. राज्याच्या मायबोलीला तिचा मान मिळावा अशी अपेक्षा राज्यातील जनताही व्यक्त करीत आहे. असे असताना मात्र गोंदियात मराठी शाळांना अवकळा आली असून येथील एका मराठी शाळेला बंद करण्याची नामुष्की नगर परिषदेवर आली आहे. यामुळे एक मराठी शाळा बंद करून या शाळेतील विद्यार्थ्यांचे अन्य शाळेत समायोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देनगर परिषदेच्या शाळा धोक्यात : अन्य शाळेत केले समायोजन

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्रात सर्वच शाळांना ‘मराठी’ भाषा शिकविणे अनिवार्य करण्यात असा अशी भूमिका खुद्द मुख्यमंत्र्यांची सुध्दा आहे. राज्याच्या मायबोलीला तिचा मान मिळावा अशी अपेक्षा राज्यातील जनताही व्यक्त करीत आहे. असे असताना मात्र गोंदियात मराठी शाळांना अवकळा आली असून येथील एका मराठी शाळेला बंद करण्याची नामुष्की नगर परिषदेवर आली आहे. यामुळे एक मराठी शाळा बंद करून या शाळेतील विद्यार्थ्यांचे अन्य शाळेत समायोजन करण्यात आले आहे.प्रत्येकच राज्यातील आपली मायबोली असून त्या राज्यात त्याच भाषेचा सर्वाधीक वापर केला जातो. त्या राज्याचा सर्व कारभारही त्यांच्याच भाषेत होतो. शाळांमध्ये इंग्रजी विषयासह राज्याच्या मायबोलीचा विषय अनिवार्य असतो. आपल्या मायबोलीला एवढा मान देणे गरजेचे असतानाच तेवढे बंधनकारक करणे हे तेथील राज्य शासनाचे आद्य कर्तव्य आहे. असे असताना मात्र महाराष्ट्रात ‘मराठी’ भाषेला आपला मान गमवावा लागत आहे. आज मोठमोठ्या ग्रुप्सच्या खासगी शाळांची संख्या वाढली आहे. या शाळांत इंग्रजी भाषेचा वापर अनिवार्य असताना मराठी भाषेला मात्र दुय्यम स्थान दिले जात आहे. यामुळेच महाराष्ट्रात राहुनही येथील रहिवाशांना मराठी भाषा येत नाही ही खेदाची बाब आहे. याचाच फटका नगर परिषदेच्या शाळांनाही बसत आहे. नगर परिषदेकडून वर्ग एक ते चौथी पर्यंतच्या १० मराठी प्राथमिक शाळा चालविल्या जात होत्या. मात्र या खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे नगर परिषद शाळांचा ठाव लागत नसल्याने नगर परिषदेच्या शाळा धोक्यात येत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे पटसंख्ये अभावी नगर परिषदेला सिव्हील लाईन्स मराठी प्राथमिक शाळा बंद करावी लागली आहे. सुमारे ५ वर्षांपूर्वी ही शाळा बंद करण्यात आली असून येथील विद्यार्थ्यांंचे जवळील इंजीन शेड मराठी प्राथमिक शाळेत समायोजन करावे लागले आहे.मराठी भाषेला बॉर्डरचा फटकागोंदिया हे शहर राज्याच्या टोकावर असून छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्याला लागून आहे. शहरात मराठी भाषिकांच्या प्रमाणातच गुजराती, सिंधी व मारवाडी समाजबांधवांची संख्या आहे. मात्र हिंदी भाषिकांनी आपली भाषा सोडली नाही मात्र येथील मराठी भाषीक हिंदीत बोलायला लागले आहे. गोंदिया शहराची प्रथम भाषा हिंदी असून त्यानंतर मराठी भाषी मराठीचा वापर करीत आहेत. यामुळेही मराठी शाळा पोरक्या होत चालल्या आहेत. त्यामुळे हा क्रम बदलून मराठी भाषेला प्रथम प्राधान्य देण्याची गरज आहे.आपल्या मायबोलीचा मान जपण्याची गरजआपल्या मायबोलीला तिचा खरा मान मिळावा यासाठी मराठी भाषीकांनी मराठी भाषेचा वापर त्यांच्या दैनंदिन व्यवहारात केला पाहिजे.‘महाराष्ट्रीयन आहात तर मराठीतच बोला’ हे सूत्र अंमलात आणण्याची गरज आहे. शिवाय राज्य शासनाने तसे आदेश काढून राज्यातील प्रत्येकच शाळेत मराठी शिकविणे बंधनकारक करण्याची गरज आहे.