शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

शहरासह ग्रामीण भागात हत्तीरोग निर्मूलन अभियान

By admin | Updated: December 10, 2014 22:59 IST

राष्ट्रीय हत्तीरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग दुरीकरण मोहीम १४ डिसेंबरपासून सुरू करण्यात येत आहे. ग्रामीण भागात १६ डिसेंबरपर्यंत व शहरी भागात १८ डिसेंबरपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

१,७७४ कर्मचारी : ४६ लाख ८४ हजार गोळ्यांचे होणार वाटपगोंदिया : राष्ट्रीय हत्तीरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग दुरीकरण मोहीम १४ डिसेंबरपासून सुरू करण्यात येत आहे. ग्रामीण भागात १६ डिसेंबरपर्यंत व शहरी भागात १८ डिसेंबरपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डी.डी. शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी हरीश कळमकर व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.विनोद वाघमारे यांच्या उपस्थितीत जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.सलील पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सदर माहिती दिली.जिल्ह्यात १३ लाख ६१ हजार ३८६ नागरिकांपैकी १२ लाख ६८ हजार ९४१ लोकांना डीईसी व एल्बेंडाजोल गोळ्या या मोहिमेदरम्यान वाटप करण्यात येतील. यात गोंदिया तालुक्यात दोन लाख ६२ हजार ३३९, तिरोडा तालुक्यात एक लाख ३७ हजार ०५५, आमगाव तालुक्यात एक लाख २४ हजार ६३२, गोरेगाव तालुक्यात एक लाख २१ हजार ७१०, देवरी तालुक्यात एक लाख आठ हजार ६३५, सडक/अर्जुनी तालुक्यात एक लाख आठ हजार २२६, सालेकसा तालुक्यात ८४ हजार १८० व अर्जुनी/मोरगाव तालुक्यात एक लाख ३८ हजार ८७३ व शहरी क्षेत्रात एक लाख ८३ हजार २९१ नागरिकांना सदर गोळ्या चारण्यात येणार आहेत. यासाठी ३३ लाख ९९ हजार ६४५ डीईसी व १२ लाख ८४ हजार ४४० एल्बेंडाजोल गोळ्यांची गरज जिल्हा हिवताप विभागाला आहे. गोळ्यांच्या वितरणासाठी एक हजार ६८१ कर्मचाऱ्यांना कामावर लावण्यात येत आहे. तसेच सुपरवायजर म्हणून ९३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात एक हजार ५४८ कर्मचारी व ८६ पर्यवेक्षक ग्रामीण क्षेत्र तसेच १३३ कर्मचारी व सात पर्यवेक्षक शहरी क्षेत्रात काम करणार आहेत. नागपूरची एक चमू रात्रीच्या वेळी काही निवडक ठिकाणांवर सर्व्हेक्षण करते. हे सर्व्हेक्षण गोंदिया शहरातील वाजपेयी वॉर्ड, रावणवाडी आरोग्य केंद्रांतर्गत चांदनीटोला, कटंगटोला, भानपूर आरोग्य केंद्रांतर्गत लोधीटोला, एकोडी आरोग्य केंद्रांतर्गत ओझीटोला व खर्रा येथे करण्यात आले. यात वाजपेयी वार्डात १०, कटंगटोला येथे एक, लोधीटोला येथे नऊ, ओझीटोला येथे चार व खर्रा येथे पाच अशाप्रकारे २९ हत्तीपाय रूग्ण आढळले. दवनीवाडा आरोग्य केंद्रांतर्गत रतनारा येथे चार, कवलेवाडा आरोग्य केंद्रांतर्गत चिचगाव येथे सहा, तिरोड्याच्या भूतनाथ वार्डात चार व चान्ना बाक्टी आरोग्य केंद्रांतर्गत येरंडी येथे एक हत्तीपाय रूग्ण आढळला. (प्रतिनिधी)