शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

टोयागोंदीच्या महिलांचा दारूबंदीसाठी एल्गार

By admin | Updated: October 20, 2016 00:16 IST

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर असलेल्या व सालेकसा तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम भागातील टोयागोंदी या गावातील महिलांनी

ठाण्यावर धडक : दखल घेण्यासाठी पोलिसांवर दबावसालेकसा : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर असलेल्या व सालेकसा तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम भागातील टोयागोंदी या गावातील महिलांनी गावात दारूबंदी करून अवैध दारू विक्री तत्काळ बंद करावी यासाठी सरळ सालेकसा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढला. टोयागोंदी या गावात अनेक वर्षापासून अवैध दारूचा व्यवसाय काही लोक करीत आहेत. त्यामुळे गावातील वातावरण बिघडले आहे. दारूमुळे तरूण वर्गासह बालकांचाही कल मद्यपानाकडे वाढत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मद्यपान करणाऱ्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. याचा दुष्प्रभाव गावातील सामाजिक स्वास्थ्यावर पडत असून गावातील महिलांना व मुलींना असुरक्षित वाटू लागले आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. गावात पूर्णपणे दारूबंदी करावी यासाठी आधीसुध्दा निवेदन देण्यात आले. परंतु दारूबंदीसाठी पाऊल उचलण्यात आले नाही, असे महिलांनी सांगितले. त्यामुळे शेवटी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. टोयागोंदी येथील सर्व महिला २० किमी अंतरावरून सालेकसा येथे पोहोचल्या. गावात मोर्चा काढून नगर भ्रमण करीत सरळ पोलीस स्टेशनवर धडक दिली. तेथे काही काळ धरणे देत दारूबंदीचा आवाज बुलंद केला व पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांना निवेदन देऊन दारूबंदीसाठी आग्रह धरला.मोर्चाचे नेतृत्व टोयागोंदी येथील सरपंच गीता लिल्हारे, उपसरपंच रत्नकला पटले यांनी केले असून यात ज्योती साखरे, गितेश्वरी साखरे, गीता वट्टी, पुष्पा पंधरे, मीना मरकाम, डुलेश्वरी मच्छिरके, ज्योती अशोक साखरे, चंपा सहारे, सविता साखरे, चंद्रकला भलावी, कला सवासेठी, माया भोंडेकर, जानकी अलकरा, सरीता भोंडेकर, विमला मरकाम, मीना टेंभुकर, मन वट्टी, अग्रता लिल्हारे, सोनकी रतोने, कविता वट्टी, निर्मला लिल्हारे, जामवंती ढेकवार सहभागी झाल्या. (ता.प्रतिनिधी)- तत्काळ कार्यवाही करणार टोयागोंदीसह तालुक्यातील विविध ठिकाणी असलेली अवैध दारूविक्रीची तक्रार पुढे येत आहे. त्यावर तत्काळ पायबंद घालण्याची कारवाई सुरू आहे. पोलीस मित्र सरपंच, पोलीस पाटील यांच्या माहितीने संपूर्ण अवैध दारूबंदीवर संपूर्ण पायबंद घालण्यासाठी पोलीस विभाग तयार असल्याचे ठाणेदार मोहन खंदारे यांनी सांगितले.दारूबंदीसाठी योग्य कारवाई करून अवैध दारु विक्री थांबविली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे धरणे आंदोलन करण्याचा इशारा टोयागोंदीच्या महिलांनी दिला.