मुंडीकोटा : जवळच्या सरांडी येथील दारूबंदी समितीच्या वतीने गावात दारुबंदी करण्यात आली. या गावात मागील काही वर्षापासून दारू विकणे, दारू काढणे असे अनेक अवैध धंदे सुरु होते. गावात दारू पिऊन शिवीगाळ करणे, अभद्र भाषेत बोलणे अशी नेहमीची परंपरा होती. यामुळे येथील महिलांनी एकत्र येऊन समिती गठित केली. पोलिसांच्या सहकार्याने दारूबंदीला सुरूवात केली. या गावातील दारूमुळे अनेकांचे कुटूंब उध्दवस्त झाले होते. अनेक कुटूंब चव्हाट्यावर आले होते. अनेकांची दारू पिण्याच्या सवयीमुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली होती. अनेक युवक दारू पिण्याच्या नादात लागले होते. येथील महिला समितीच्या वतीने गाव सकाळी व संध्याकाळी गावात फिरून दारू पिण्याऱ्यांवर व काढणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करुन पोलिसांच्या स्वाधीन केले जाते. मुंडीकोटा येथील पोलीस चौकी प्रमुख व त्यांचे सहकार्य या महिला समितीला वेळोवेळी सहकार्य करीत आहेत. या महिला समितीव्दारे दारू पिणाऱ्यांवर व काढणाऱ्यांवर आळा बसला आहे. दारू पिणे व काढणे आता बंद झाले आहे. गावात तंटे, भांडणे, होत नसून गाव शांतमय झालेला दिसत आहे. या दारूबंदी मोहीम समितीचे अध्यक्ष रायवंता गजभिये, इंदू भोंगाडे, किशोर दमाहे, सरपंच शोभा कामडी, शामराव भोंगाडे, रामकृष्ण लांजेवार, पुंडलीक भोंगाडे, गोपाल मुकुरणे, शालीक वदणे, महेंद्र वाणी, शुक्रराम बदणे, भोजराम भोंगाडे, डुलीचंद कुऱ्हाडे, श्रीदेव रोकडे, संदीप दमाहे, प्रदीप कटरे, बेबी लांबट, शिहा निशाने, कुसुम नंदेश्वर, शांता पटले, विमला शेंडे, बबीता मुकुरणे, वर्षा गोस्वामी यांनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)
सरांडीच्या महिलांचा दारूविरूद्ध एल्गार
By admin | Updated: November 8, 2014 22:40 IST