शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या लंपडावाने ग्रामीण नागरिक त्रस्त

By admin | Updated: May 9, 2017 00:57 IST

मागील एक महिन्यापासून ग्रामीण व शहरी भागात विजेचा लंपडाव सुरु आहे. विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झाले आहे.

अधिकाऱ्यांना निवेदन : दोन महिन्यांपासून वाढला प्रकार लोकमत न्यूज नेटवर्कइंदोरा-बुजरुक : मागील एक महिन्यापासून ग्रामीण व शहरी भागात विजेचा लंपडाव सुरु आहे. विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झाले आहे. आठ दिवसांपासून ग्रामीण भागात ऐन दुपारच्या वेळेत भारनियमन केले जात आहे.भारनियमनाची वेळ सकाळी ६ वाजतापासून १० वाजतापर्यंत ठेवावी, यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा तिरोडाच्यावतीने तहसीलदार तिरोडा यांना निवेदन देण्यात आले आहे. मागील दोन महिन्यांपासून विज पुरवठा कधीही खंडीत होत असते. रात्र असो किंवा दिवस, वेळेचा कुठलाच बंधन न ठेवता मनमर्जीने विद्युत पुरवठा बंद केला जातो. सध्या उन्हाळ्याचे दिवस असताना सकाळी १० वाजतापासून तापमानाचा पारा चढत आहे, घरात राहणे कठीण होत आहे. परिसरातील लघु, कुटीर उद्योगांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.लहान मुले, म्हातारे व्यक्ती सुध्दा उन्हामुळे घाबरले असतात. याच वेळेत विद्युत विभाग सकाळी १० वाजतापासून सायंकाळी ४ वाजतापर्यंत विद्युत पुरवठा बंद ठेवतात. रात्री ७ वाजतापासून अजून विजेचा लंपडाव सुरु असतो. यात ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाले आहेत. या संदर्भात विज वितरण कार्यालयाकडे नागरिकांनी तक्रार केली मात्र या गंभीर समस्येकडे विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष केले आहे. तिरोडा तालुक्यात मागील अनेक महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. एप्रिल, मे महिना तापत आहे. पारा ४५ अंशापर्यंत पोहचला आहे. दुपारच्यावेळीही भारनियमन होत आहे. उन्हामुळे अंगाची लाई-लाई होत असताना महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीतर्फे ग्रामीण भागात ६ तास विज पूरवठा खंडीत केला जातो. भर उन्हात दुपारच्या वेळी भारनियमन केले जात आहे. सतत होणारे भारनियमन बंद करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष रफीक शेख यांच्या नेतृत्वात तहसीलदार कुंभरे व नायब तहसीलदार पटले यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. सदर निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता तिरोडा यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी अनेक शेतकरी व नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)