शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या लपंडावामुळे वीज ग्राहक झाले हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2022 05:00 IST

विलास चाकाटे लोकमत न्यूज नेटवर्क लोहारा : उन्हाळ्याच्या दिवसांत विजेची अधिक गरज असताना, वेळी-अवेळी वीज जात असल्याने नागरिकांना उकाड्याचा ...

विलास चाकाटेलोकमत न्यूज नेटवर्कलोहारा : उन्हाळ्याच्या दिवसांत विजेची अधिक गरज असताना, वेळी-अवेळी वीज जात असल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मागील दोन दिवसांपासून दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होत असल्याने वीज ग्राहकांनी देवरी तालुक्यातील मुल्ला वीज केंद्राविरुद्ध संताप व्यक्त केला. वीज पुरवठा अचानक खंडित होण्याच्या प्रकारांमुळे व विद्युत दाब कमी-जास्त होण्याच्या प्रकारामुळे पंखे व कुलर बंद पडल्याने नागरिक उकाड्याने त्रस्त बनले आहेत.जिल्ह्याच्या तापमानात वाढ झाल्याने कुणी घरी, तर कुणी दुकानात कुलर, पंख्याचा वापर करतात. अशा स्थितीत दिवसभर वीज पुरवठा बंद राहत असल्याने वीज ग्राहकांनी संताप व्यक्त केला. महावितरणकडून दुरुस्ती कामासाठी वीज पुरवठा बंद राहणार असेल, तर तसे ग्राहकांना एक-दोन दिवस आधी मोबाइलवर ‘एसएमएस’ द्वारे कळविले जाते. परंतु, वीज पुरवठा दिवसभर  बंद राहणार असल्याचा कुठलाही संदेश न देता अचानक वीज पुरवठा बंद केला जात असल्याने वीज ग्राहक वैतागले आहेत. पंखे - कुलर बंद पडत असल्याने लहान मुले व ज्येष्ठ नागरिक उकाड्याने हैराण बनतात. मुल्ला वीज केंद्राअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावामध्ये विजेचा लपंडाव सुरू होता. व्होल्टेजच्या समस्येमुळे पंखे, कुलर, टीव्ही, फ्रीज खराब होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. 

शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठ्याची गरज- विजेच्या समस्येमुळे शेतीसाठी देखील सिंचन कसे करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वीज ग्राहकांना या समस्येला सामोरं जावं लागत आहे. सतत वाढत चाललेल्या तापमानामुळे धान पिके सुरक्षित राहण्यासाठी पाण्याची अत्यंत गरज असते. अशावेळी वीज पुरवठा महत्त्वाचा असतो. तसेच आठवडाभरापासून तापमानातही वाढ झाल्याने वीज पुरवठा सुरळीत राहणे गरजेचे बनले आहे. यादृष्टीने महावितरण कंपनीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

अधिकारी व कर्मचारी नॉट रिचेबल- मुल्ला वीज केंद्रातील अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांना शेतकरी अथवा उकाड्याने त्रस्त बनलेल्या वीज ग्राहकांनी फोन लावले असता, अधिकारी व कर्मचारी नॉट रिचेबल दाखवतो, तर काही कर्मचारी ग्राहकांशी उद्धटपणे वागत असल्याची वीज ग्राहकांची तक्रार आहे.

 

टॅग्स :electricityवीज