सालेकसा : मागील दोन वर्षापासून घोषित असलेल्या नगर पंचायत सालेकसा येथील निवडणूक प्रक्रिया पुन्हा स्थगित झाली आहे. त्यामुळे पुन्हा सालेकसावासीयांचे अपेक्षाभंग होताना दिसत आहे. एक वर्षापूर्वी सालेकसा नगर पंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू होताच आमगाव खुर्द येथील काही लोकांनी आमगाव खुर्द ग्रामपंचायतला सुद्धा नगर पंचायतीत समाविष्ट करण्याची मागणी करत कोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे ऐनवेळी निवडणुकीला स्थिगिती आली होती. नुकतीच निवडणूक आयोगाने नगर पंचायत निवडणूक घेण्यासाठी मतदार यादीची प्रक्रिया सुरू केली होती. परंतु पुन्हा आमगाव खुर्द वासीयांनी निवडणूक प्रक्रियेवर स्थगिती आणली आहे. मागील दोन वर्षापासून प्रशासक म्हणून तहसीलदार येथील कामकाज पाहत आहेत. परंतु लोकशाही पद्धतीने निवडून आलेले शासन केव्हा हा प्रश्न कायम आहे. (तालुका प्रतिनिधी)
सालेकसा नगर पंचायतची निवडणूक प्रक्रिया पुन्हा स्थगित
By admin | Updated: March 19, 2017 00:26 IST