शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
4
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
5
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
6
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
7
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
8
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
9
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
10
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
11
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
12
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
13
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
14
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
15
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
16
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
17
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
18
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
19
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
20
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!

१६२ ग्रामपंचायतीच्या ४७८ प्रभागांची निवडणूक

By admin | Updated: July 22, 2015 02:02 IST

जिल्हयातील १४८ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक तसेच १४ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी २५ जुलै रोजी निवडणूक होत आहे.

भंडारा : जिल्हयातील १४८ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक तसेच १४ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी २५ जुलै रोजी निवडणूक होत आहे. निवडणुसाठी उमेदवारांनी कंबर कसली असून प्रचार कार्याला वेग आला आहे. या निवडणुकीसाठी ४८२ मतदान केंद्र राहणार आहेत. मोहाडी तालुक्यात ३४५ उमेदवार रिंगणातमोहाडी : १७ ग्रामपंचायतीच्या ५२ वॉर्डासाठी अंतिम छाननी नंतर ३४५ उमेदवार रिंगणात असून प्रचाराची रणधुमाळी सुरु झालेली आहे. ५२ जागेसाठी ४०७ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. नामांकन अर्जाची छाननी करताना तीन नामांकन अवैध ठरले तर ५९ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने आता ३४५ उमेदवार रिंगणात आहेत. मोहाडी तालुक्यातील भिकारखेडा, जांभोरा, देव्हाडा बु., केसलवाडा, पांजराबोरी, खडकी डोंगरदेव, पारडी, पिंपळगाव झंझाड,मांडेसर, सालई खुर्द, ताडगाव सिहरी, कान्हळगाव सि., दहेगाव, पिंपळगाव, रोहा, पाचगाव, पाहुणी या १७ गट ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या २५ जुलै रोजी होणार असून २७ जुलै रोजी मतमोजणी घेण्यात येणार आहे. मतमोजणी परमात्मा एक भवन आंधळगाव रोड मोहाडी येथे होणार असून सुरक्षेच्या दृष्टीने मोहाडीचे ठाणेदार जोतीराम गुंजवटे व आंधळगावचे ठाणेदार मनोज काळबांधे यांच्या चमूचा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेवर जिल्हा गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी रमेश धुसर यांच्या मार्गदर्शनाखाली साध्या गणवेशातील पोलीस नजर राहणार आहे. लाखनी तालुक्यात २५,४५७ मतदार लाखनी : तालुक्यातील २१ ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूक पार पडणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्यानंतर तहसील प्रशासनाने ग्रामपंचायत निवडणुकांची जय्यत तयारी केली आहे. तालुक्यातील २१ ग्रामपंचायतच्या ६६ प्रभागासाठी निवडणूक पार पडणार आहे. यात २५ हजार ४५७ मतदार मतदान करणार आहेत. पुरुष मतदारांची संख्या १२ हजार ८८६ आहे तर महिला मतदारांची संख्या १२ हजार ५७१ आहे. २१ ग्रामपंचायतमध्ये १५९ सदस्यांची निवड करावयाची आहे. तालुक्यातील परसोडी ग्रामपंचायत गट ग्रामपंचायत खुर्शीपार मध्ये सात उमेदवारांची निवड करावयाची आहे. खेडेपार ग्रामपंचायतमध्ये सात उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. रेंगेपार (कोठा) ९, दैतमांगली गटग्रामपंचायत चिखलाबोडी ७, किन्ही गट ग्रामपंचायत सोनखारी ७, सोमलवाडा गटग्रामपंचायत मेंढा ९, खैरी ७, सिंदीपार गटग्रामपंचायत मुंडीपा ७, रेंगेपार (कोहळी) गटग्रामपंचायत चिचटोला ९, खाबेटेकडी ७, शिवनी ७, रामपुरी गटग्रामपंचायत नान्होरी ७, डोंगरगाव (साक्षर) ७, सोनमाळा ७, झरप गटग्रामपंचायत कोलारा ७, लोहारा गटग्रामपंचायत नरव्हा ९, सिपेवाडा ७, चान्ना ९, पोहरा गटग्रामपंचायत गडपेंढरी मेंढा १५, रेंगोळा गटग्रामपंचायत केसलवाडा (राघोर्ते) ७, पालांदूर पोटनिवडणूक १ याप्रमाणे २१ ग्रामपंचायतमध्ये १५९ सदस्य विविध गटातून निवडून द्यावयाची आहेत.लाखनी तालुक्यातील पोहरा, सोमलवाडा, रेंगेपार (कोहळी), सिंदीपार (मुंडीपार) येथील निवडणुका रंगतदार होणार आहेत. प्रत्येक गावात पॅनल तयार झाले असून कुठे दुहेरी तर कुठे तिहेरी लढत होणार आहे. महिलांना ५० टक्के आरक्षण असल्याने महिलांच्या पॅनल निवडणुकीसाठी तयार झाल्या आहेत. युवक व नवमतदारांच्या पॅनल गावाच्य विकासासाठी सज्ज झालेल्या आहेत. माजी सरपंच, उपसरपंच व सदस्य आपले नशिब आजमविण्यासाठी व पुन्हा विकासाची संधी मिळावी यासाठी निवडणूक रिंगणात आहेत. तालुक्यात रोवणी सुरु आहे. थांबलेला पाऊस सुरु झाल्यामुळे घराघरात प्रचार करण्यासाठी संध्याकाळची वेळ उत्तम असल्याने डोअर टू डोअर प्रचार सुरु आसहे. ग्रामपंचायत निवडणुकात जि.प. व पं.स. निवडणुकात विजयानंतर काँग्रेसने पॅनेल तयार करून ग्रामपंचायत ताब्यात कशा मिळतील या प्रयत्नात आहेत. भाजपा नेत्यांनी कंबर कसली आहे.लाखनी तालुक्यात २१ ग्रामपंचायतमध्ये ६६ प्रभागाचे निवडणूक घेण्यासाठी ३०० कर्मचाऱ्यांची चमू तयार करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी तहसीलदार डी.सी. बांबोर्डे, निवडणूक निर्णय अधिकारी डी.ए. लंजे, जे.डब्लू. राऊत, एस.व्ही. भोयर, एस.एस. नागलवाडे, निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)