शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठांनी एकटेपणाची भावना बाळगू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 00:33 IST

आजची पिढी ही घरातील ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाची वागणूक देत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी कायदे तयार करण्यात आले आहे.

ठळक मुद्देन्या. मालोदे यांचे प्रतिपादन : कायदेविषयक जनजागृती शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आजची पिढी ही घरातील ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाची वागणूक देत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी कायदे तयार करण्यात आले आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांना न्याय पाहिजे आहे. त्यांनी कायद्याचा आधार घ्यावा, असे प्रतिपादन न्या. मालोदे यांनी केले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व ज्येष्ठ नागरिक संघाच्या संयुक्तवतीने आयोजीत कायदेविषयक जनजागृती शिबिरात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून अ‍ॅड.बिणा बाजपेई, नेतराम पारधी, आशा ठाकुर, अ‍ॅड. आगाशे उपस्थित होते. पुढे बोलताना न्या. मालोदे यांनी, ज्येष्ठ नागरिकांनी आपण एकटे असल्याची भावना मनात आणू नये. तुमच्या पाठीशी इतर ज्येष्ठ नागरिक व संघटना आहेत. प्रत्येक व्यक्तीला म्हातारपण हे येणारच आहे. व्यक्ती विचाराने कमजोर होत नाही तर शरिराने कमजोर होतो. घरातील कुटूंबातील व्यक्तींनी त्यांच्या घरातील ज्येष्ठ नागरिकांचा आदर ठेवावा व जीवनात त्यांचे मार्गदर्शन घ्यावे असे मत व्यक्त केले.अ‍ॅड.बाजपेई यांनी, नागरिकांचे मुलभूत अधिकार व कर्तव्य याबाबत माहिती दिली. ज्येष्ठ नागरिकांची मुले विदेशात किंवा बाहेर ठिकाणी नोकरी करतात व त्यांचे ज्येष्ठ नागरिक असलेले आई-वडील एकटे राहतात. त्यामुळे त्यांना जीवन जगणे कठीण होते, त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. अशावेळी ज्येष्ठ नागरिक वृध्दाश्रमात जावून आपले एकटेपण दूर करतात असे सांगितले. पारधी यांनी, ज्येष्ठ नागरिकांबाबत शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. ठाकुर यांनी, ज्येष्ठ नागरिक हे एकटे नसून त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत, त्यांनी एकटेपण बाळगू नये, तसेच त्यांच्या हक्काकरीता त्यांनी जागृत राहावे असे त्यांनी सांगितले. अ‍ॅड.आगाशे यांनी, संयुक्त कुटूंबामुळे विकास होतो, परंतू आज संयुक्त कुटूंब पध्दती कमी झालेली दिसून येते. वयोवृध्द व्यक्तींकरीता प्रत्येकाने सहकार्याची भावना ठेवावी तसेच त्यांना मदत करावी असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अधीक्षक एस.जी. कान्हे, जी.सी. ठवकर, श्रीमती डी.ए. थोरात, जी.एन. जैतवार व हेरॉल्ड बॅस्टीन यांनी सहकार्य केले. आभार अ‍ॅड.एम.पी. चतुर्वेदी यांनी मानले.